महाराष्ट्रातील तीन गुन्हेगारांवर कर्नाटकात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:22 AM2021-04-10T04:22:03+5:302021-04-10T04:22:03+5:30
बुधवारी (दि. ७) सराईत गुन्हेगार संतोष काशिनाथ विजापुरे, प्रशांत बाबूराव मंगरुळे (दोघे रा. गुद्देवाडी), चिदानंद बिराजदार (रा. कल्लकर्जाळ, ता. ...
बुधवारी (दि. ७) सराईत गुन्हेगार संतोष काशिनाथ विजापुरे, प्रशांत बाबूराव मंगरुळे (दोघे रा. गुद्देवाडी), चिदानंद बिराजदार (रा. कल्लकर्जाळ, ता. अक्कलकोट) यांनी हलसंगी-भतगुणकी (ता. इंडी, जि. विजापूर) दरम्यान असलेल्या एका ढाब्यावर या तिघांसह अनोळखी काहीजण दारू पिऊन धिंगाणा घालत होते. तेव्हा त्यांच्याकडे गावठी पिस्तूल व गोळ्या असल्याची माहिती खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हेडकॉन्स्टेबल सिद्धाराम कोन्हाळी, गोविंद छत्रे यांच्यासह काही पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा वरील गुन्हेगार दारू पिऊन धिंगाणा घालत होते. तेव्हा संतोष विजापुरे यास अटक करण्यात पोलिसांना यश आले. उर्वरित सर्व पळून जाण्यात यशस्वी ठरले.
या घटनेची माहिती विजापूर पोलीस अधीक्षक अनुपम अग्रवाल यांना दिली असता त्यांनी उर्वरित गुन्हेगारांना तत्काळ अटक करण्यासाठी पथक तैनात करण्याचे आदेश दिले. अटकेत असलेला गुन्हेगार संतोष यास इंडी न्यायालयासमोर उभा केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. पोलीस निरीक्षक पी. एन. मनगुळी हे तपास करीत आहेत.
फोटो
०९ प्रशांत मंगरुळे
०९ चिदानंद बिराजदार
०९ संतोष विजापुरे