Crime News: वन्यप्राण्याची शिकार करणाऱ्या दोन जणांना सोलापूरच्या वनविभागाने घेतले ताब्यात
By Appasaheb.patil | Published: February 13, 2023 01:54 PM2023-02-13T13:54:18+5:302023-02-13T13:54:44+5:30
Crime News: तरस या वन्य प्राण्याची शिकार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या एका आरोपीनंतर वनविभागाने या प्रकरणातील आणखी दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना आज सोमवारी मंगळवेढा येथील न्यायालयात उभे केले जाणार आहे.
- आप्पासाहेब पाटील
सोलापूर - तरस या वन्य प्राण्याची शिकार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या एका आरोपीनंतर वनविभागाने या प्रकरणातील आणखी दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना आज सोमवारी मंगळवेढा येथील न्यायालयात उभे केले जाणार आहे.
दरम्यान, ८ फेब्रुवारी रोजी पंढरपूर वनपरिक्षेत्रांतर्गत मंगळवेढा तालुक्यातील मारोळी येथे तरस या वन्य प्राण्याला जखमी करून अवैधरीत्या शिकार करण्यात आली. या प्रकरणी उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, वनसंरक्षक बी.जी. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने श्रीशैल शंकर जमखंडे (वय ३०, रा.मारोळे, ता.मंगळवेढा) या संशयिताला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदला. मंगळवेढा न्यायालयापुढे करून १३ फेब्रुवारीपर्यंत वन कोठडी मिळविली होती. त्यानंतर तपास कार्यात आणखी दोघांना ताब्यात घेतले आहे.
दोन दिवसांच्या काळात झालेल्या तपासात आणखी दोघांची नावे या प्रकरणी निष्पन्न झाली. त्यानुसार, चंद्रकांत गुरप्पा हिंचगिरे (वय २९), मलकारी चंद्रकांत हिंचगिरे (४३) (दोघे रा.जठर बबलाद, ता.जत) यांना ताब्यात घेण्यात आले. वरील सर्व आरोपींना आज सोमवारी न्यायालयात उभे केले जाणार आहे. तिघांविरुद्ध अवैध शिकार केल्याप्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलमांन्वये वनगुन्हा नोंदला आहे. या प्रकरणी अधिक तपास सहा.वनसंरक्षक बी.जी. हाके, वनपरिक्षेत्र अधिकारी सी.एस. वाघ करीत आहेत.