उजनीत जलसमाधी आंदोलन केल्याबद्दल १४ कार्यकर्त्यांवर गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:17 AM2021-05-03T04:17:17+5:302021-05-03T04:17:17+5:30
टेंभुर्णी : उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील २२ गावांसाठी नेल्याच्या निषेधार्थ उजनी पाणी ...
टेंभुर्णी : उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील २२ गावांसाठी नेल्याच्या निषेधार्थ उजनी पाणी बचाव संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी उजनी जलाशयात जलसमाधी आंदोलन केले. या आंदोलनात सहभागी झालेल्या १४ कार्यकर्त्यांवर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जनहित संघटनेचे प्रभाकर देशमुख, शेतकरी नेते अतुल खुपसे, माऊली हळणवर, दत्ताभाऊ व्यवहारे, विठ्ठल मस्के, अण्णासाहेब जाधव, किरण भांगे, बापू मिटकरी, धनाजी गडदे, बळीराम गायकवाड, जयप्रकाश मोरे, औदुंबर गायकवाड, श्रावण लवटे, अभिजीत पाटील या चौदा कार्यकर्त्यांवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश डावलून जमाव जमवून शासनाविरोधात घोषणाबाजी केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कार्यकर्त्यांनी शनिवारी सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत उजनी जलाशयात उजनी गावाजवळील उस्मानाबाद पाणी पुरवठा केंद्राजवळ जलसमाधी आंदोलन केले होते. पुढील तपास हवालदार स्वामीनाथ लोंढे करत आहेत.
----