क्वारंटाईन होण्यास नकार देणाऱ्या ३४ बाधितांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:17 AM2021-04-29T04:17:35+5:302021-04-29T04:17:35+5:30
ग्रामसेवक अविनाश मोरे यांनी दिलेल्या फिर्यादित २१ ते २४ एप्रिलदरम्यान केलेल्या चाचण्यांमध्ये भोसे येथील बाधित ३४ लोकांनी इतरांना कोरोनाची ...
ग्रामसेवक अविनाश मोरे यांनी दिलेल्या फिर्यादित २१ ते २४ एप्रिलदरम्यान केलेल्या चाचण्यांमध्ये भोसे येथील बाधित ३४ लोकांनी इतरांना कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून तयार केलेल्या विलगीकरण कक्षात राहणे आवश्यक होते.
त्या ३४ पॉझिटिव्ह लोकांनी विलगीकरण कक्षात दाखल न होता बाहेर फिरत असल्याने कोरोनाचा फैलाव होण्यास कारणीभूत ठरू लागल्याचे लक्षात येताच ग्रामस्तरीय समितीने त्यांना याबाबत सूचना देऊनही त्यांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केले.
यामुळे ब्रह्मदेव काकडे, अमोल कोंडुभैरी, लक्ष्मीबाई शिंदे, तानाजी कोळी, शिवाजी नागणे, तेजश्री नागणे, अनिल नागणे, उमा गायकवाड, विशाल काटकर, विजय कोरे, अजित कोळी, अनिल विष्णू नागणे, प्रदीप पाटील, संगीता काटकर, दत्ता जगधने, अशोक घाडगे, रत्नमाला सावंत, बाळासाहेब पाटील, अर्चना खडतरे, विजय गिरी, अनिकेत नायकवडी, दत्तात्रय खडतरे, वंदना कोपे, तुकाराम नायकवडी, राजाराम खडतरे, विलास काकडे, विमल काकडे, शोभा काकडे, तानाजी गंगधरे, अक्षय काकडे, शिवाजी काकडे, सुषमा काकडे, सीताराम काकडे, विक्रम काकडे यांच्यावर भादंवि १८८, २६९, २७० साथीचे रोगप्रतिबंधक अधिनियम १८५७ च्या कलम २, ३, ४ कायदा कलम ५१ ब अन्वये गुन्हा नोंदला आहे, तर तलाठी जयश्री कल्लाळे यांनी खासगी रुग्णालय सील केले आहे.
----