बिनधास्त वावरणाऱ्या ३८ जणांवर गुन्हे ; साडेतेरा लाखांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:21 AM2021-03-14T04:21:08+5:302021-03-14T04:21:08+5:30

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विविध निर्बंधही घातले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंढरपूर पोलीस ...

Crimes against 38 people without any reason; A fine of Rs | बिनधास्त वावरणाऱ्या ३८ जणांवर गुन्हे ; साडेतेरा लाखांचा दंड वसूल

बिनधास्त वावरणाऱ्या ३८ जणांवर गुन्हे ; साडेतेरा लाखांचा दंड वसूल

Next

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विविध निर्बंधही घातले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंढरपूर पोलीस प्रशासनाने शहर व ग्रामीण भागात जनजागृती करून मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतराचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तरीही काही नागरिक नियमांचे उल्लंघन करीत आहेत. अशांवर पोलीस प्रशासनामार्फत कारवाईचा बडगा उगारला आहे.

७१ दिवसात असा आकारला दंड

नववर्षाच्या प्रारंभी १ जानेवारी ते १२ मार्च या कालावधीत मास्क न वापरणाऱ्या ३ हजार ५९ नागरिकांवर कारवाई करून १३ लाख ३२ हजार ७०० रुपये व गर्दीच्या ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन न करणाऱ्या १५५ नागरिकांकडून १५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग प्रतिबंध कायद्यांतर्गत कलम १८८ अन्वये ३८ जणांवर गुन्हे नोंदले आहेत. नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे. मास्कचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन करावे, प्रशासनाच्या संदर्भात दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करावे, नागरिक कोरोनाबाबत नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर दंडात्मक तसेच साथरोग प्रतिबंध कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल, अशा इशाराही उपविभागीय पोलीस अधिकारी कदम यांनी यावेळी दिला आहे.

------------

Web Title: Crimes against 38 people without any reason; A fine of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.