वीज चोरी करणाऱ्या ४८ जणांवर माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:22 AM2021-08-01T04:22:01+5:302021-08-01T04:22:01+5:30

मंगळवेढा शहराला सकाळी पाणीपुरवठा सुरू झाल्यावर अतिरिक्त भार येऊन वीज जाण्याचे प्रमाण वाढत आहे. यासाठी साठे नगर, दत्तू गल्ली, ...

Crimes registered against 48 persons for stealing electricity at Malshiras police station | वीज चोरी करणाऱ्या ४८ जणांवर माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

वीज चोरी करणाऱ्या ४८ जणांवर माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

Next

मंगळवेढा शहराला सकाळी पाणीपुरवठा सुरू झाल्यावर अतिरिक्त भार येऊन वीज जाण्याचे प्रमाण वाढत आहे. यासाठी साठे नगर, दत्तू गल्ली, रामकृष्ण नगर, मार्केड यार्ड, बोराळे नाका येथे अतिरिक्त डीपी बसविले जाणार आहेत. हे काम पूर्ण झाल्यावर सुस्थितीत दाबाने ग्राहकांना वीज मिळणार आहे. एखाद्या ठिकाणी विजेचा घोटाळा झाल्यास कामकाजासाठी संपूर्ण लाईट बंद करावी लागत असे. आता याला पर्यायी व्यवस्था म्हणून तेथे एबी स्वीच बसविण्याची मागणी केली आहे. ही मागणी मंजूर झाल्यास घोटाळा झालेल्या तेवढ्याच भागातील वीज बंद करून बंद पडलेले काम पूर्ण केले जाणार आहे.

मंगळवेढा येथील ३३ केव्हीमध्ये रिले व ब्रेकर्स दुुरुस्त केल्याने शहराला सुरळीत वीजपुरवठा होणार आहे. वीज वितरणच्या घराजवळून गेलेल्या तारावर कोटींग बसविण्यात येणार असल्याने होणारे अपघात टळणार आहेत. शहरातील ग्राहकांच्या तक्रारीनुसार जवळपास ७०० नादुरुस्त मीटर बदलण्यात आले आहेत. पंढरपूर कार्यालयाकडून नव्याने ५०० मीटर प्राप्त झाले आहेत. कृषी संजीवनी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी केलेल्या भरण्यामधून ३३ टक्के रक्कम डोंगरगाव, खोमनाळ, दामाजीनगर या ग्रामपंचायतींना अतिरिक्त २०० केव्हीचे ट्रान्सफाॅर्मर बसविण्यात आले आहेत.

गुन्हे दाखल ग्राहक संख्या

ग्रामीण भागात वीज चोरी रोखण्यासाठी अधीक्षक अभियंता ज्ञानेश्‍वर पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथके नेमली होती. या पथकाने आंधळगाव १२, मरवडे १७, ग्रामीण १०, मंगळवेढा शहर ५, बोराळे ४ अशा एकूण ४८ जणांना पकडून त्यांच्याविरूद्ध माळशिरस येथील वीज वितरण पोलीस ठाण्याकडे गुन्हे दाखल केले आहेत. यासाठी पंढरपूरचे कार्यकारी अभियंता संजय गवळी, उपकार्यकारी अभियंता संजय शिंदे, शहरचे सहाय्यक अभियंता सचिन कोळेकर, मरवडेचे संदीप माळी, आंधळगावचे कनिष्ठ अभियंता महेश पारवे, ग्रामीणचे भगवान आलदर यांनी कारवाईसाठी परिश्रम घेतले.

Web Title: Crimes registered against 48 persons for stealing electricity at Malshiras police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.