स्त्रीभ्रूण हत्याविरोधी ठराव
By Admin | Published: January 12, 2015 01:14 PM2015-01-12T13:14:53+5:302015-01-12T13:23:32+5:30
महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्या द्वितीय कार्यकारिणीच्या बैठकीचा रविवारी सायंकाळी समारोप झाला. शेवटच्या दिवशी सभेत स्त्रीभ्रूण हत्याविरोधी ठराव करीत वर्षभरात समाजात जनजागृती करण्यावर चर्चा झाली.
माहेश्वरी सभा : दोन दिवसीय कार्यकारिणी बैठकीचा समारोप सोलापूर : महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्या द्वितीय कार्यकारिणीच्या बैठकीचा रविवारी सायंकाळी समारोप झाला. शेवटच्या दिवशी सभेत स्त्रीभ्रूण हत्याविरोधी ठराव करीत वर्षभरात समाजात जनजागृती करण्यावर चर्चा झाली. महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्या आज दुसर्या दिवशी विविध ठरावानंतर समारोप झाला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रदेश अध्यक्ष सतीश चरखा होते. यावेळी महासभेचे सदस्य सत्यनारायण लाहोटी, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा पुष्पांजली लाहोटी, उपाध्यक्षा शैलजा कलंत्री, हिरालाल मालू, रामनारायण काबरा, अशोक बंग, श्रीकिसन भन्साळी यांची प्रमुख उपस्थिती होती. मुलांवर मते लादू नका - या बैठकीत समाजाची सर्व मुलं ही केवळ व्यापार क्षेत्रात न राहता ती इतर क्षेत्रातही यावीत यावर चर्चा झाली. लोकसेवा आयोगाच्या परीक्षा मुलांनी दिल्या पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त करीत दहावी, बारावीपासूनच त्यांचा बेसिक पक्का करण्यावर आवाहन करण्यात आले. विशेषत: लग्नसमारंभात अवाढव्य खर्च टाळून कमीत कमी खर्च करा, असा संदेश सभेतून देण्यात आला. |