सराईत गुन्हेगार रमेश चव्हाणची येरवडा कारागृहात रवानगी
By विलास जळकोटकर | Updated: February 22, 2024 18:43 IST2024-02-22T18:43:44+5:302024-02-22T18:43:54+5:30
एमपीएडी कलमान्वये स्थानबद्धची ॲक्शन

सराईत गुन्हेगार रमेश चव्हाणची येरवडा कारागृहात रवानगी
सोलापूर : गावठी हातभट्टी व्यावसायिक सराईत गुन्हेगार रमेश बाळू चव्हाण याच्यावर पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांच्या आदेशान्वये एमपीडीए अधिनियमान्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली. त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली.
यातील रमेश चव्हाण हा त्याच्या साथीदारांसह जोडभावी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसरात गावठी हातभट्टी व्यवसायत गुंतलेला आहे. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमातील तरतूीचा भंग केल्याबद्दल १४९ गुन्हे दाखल आहेत. त्याला २०२० व २०२२ मध्ये प्रतिबंध करुनही तो या गुन्हेगारी कृत्यापासून परावृत्त झाला नाही. सन २०२३ मध्येही त्याच्याविरुद्ध ७ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या या कृत्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याने त्याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली. त्याची येरवडा तरुंगात रवानगी करण्यात आली.
ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.