संकटानं दिलं लढण्याचं बळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:22 AM2020-12-31T04:22:39+5:302020-12-31T04:22:39+5:30

पंढरपूर शहर व तालुक्याला भीमा नदीचे क्षेत्र लाभले आहे. यामुळे पंढरपूर तालुक्यात उसाची लागवड मोठ्या प्रमाणात होते ; ...

Crisis gave strength to fight! | संकटानं दिलं लढण्याचं बळ!

संकटानं दिलं लढण्याचं बळ!

Next

पंढरपूर शहर व तालुक्याला भीमा नदीचे क्षेत्र लाभले आहे. यामुळे पंढरपूर तालुक्यात उसाची लागवड मोठ्या प्रमाणात होते; परंतु गतवर्षी विठ्ठल सहकारी साखर कारखाना, चंद्रभागा सहकारी साखर कारखाना, विजय शुगर व सीताराम सहकारी साखर कारखाने आर्थिक अडचणीत सापडले होते. परंतु यंदाच्या वर्षी या सर्व कारखान्यांनी शेतकऱ्यांना थोड्या फार प्रमाणात एफआरपी दिली अन्‌ कारखानेही सुरू झाले आहेत. ही जमेची बाब म्हणावी लागेल.

यंदाच्या वर्षी भीमा नदीला आलेला पूर व अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांना, नागरिकांना नुकसानीस सामोरे जावे लागले. दिलासा म्हणून शासनाकडून पूर अनुदानदेखील वाटप करण्यात आले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गात ८५.५७ क्षेत्र व सांगली-सोलापूर या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामात १००.१९ क्षेत्र संपादीत केले गेले. यातील बाधित झालेल्या सर्व शेतकऱ्यांना प्रमाणात मोबदला मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

लॉकडाऊन कालावधीमुळे एकीकडे संकट असताना गुन्हेगारीचे प्रमाण गतवर्षीच्या प्रमाणात कमी असल्याचे या निमित्ताने समोर आले. पंढरपूरसह अन्य हीच स्थिती राहिली. अवैध गुटखा विक्री, दुचाकी, मोबाईल चोरणारी टोळी, अवैध वाळू उपसा यांच्यावर पोलीस खात्याने अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला.

-----

नव्यानं जगणं शिकायला मिळालं

- एकापाठोपाठ एका संकटानं जिल्ह्याला धक्के सहन करावे लागले. कोरोनाची महामारी, अतिवृष्टी, पूरस्थिती या धक्क्यातूनही सावरत जनतेनं मात करीत नव्यानं कसं जगायचं हेच या निमत्तानं सर्वांना शिकवलं. पुन्हा नव्यानं आयुष्य जगू असा विश्वास सर्वांनी दाखवला ही सकारात्मक बाब प्रत्येकांमध्ये दिसून आली.

----

Web Title: Crisis gave strength to fight!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.