संकटाने माणुसकी शिकवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:25 AM2021-02-09T04:25:30+5:302021-02-09T04:25:30+5:30

बडवे समाज आणि संत प्रल्हाद महाराज प्रतिष्ठानच्या वतीने आमदार प्रशांत परिचारक, विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके आणि दामाजी कारखान्याचे ...

Crisis taught humanity | संकटाने माणुसकी शिकवली

संकटाने माणुसकी शिकवली

Next

बडवे समाज आणि संत प्रल्हाद महाराज प्रतिष्ठानच्या वतीने आमदार प्रशांत परिचारक, विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके आणि दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान अवताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ७२ कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी आमदार प्रशांत परिचारक बोलत होते. व्यासपीठावर ह.भ.प. राणा महाराज वासकर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, प्रतिष्ठानचे अनिरुद्ध बडवे, अनंत बडवे, वैभव बडवे उपस्थित होते.

समाधान आवताडे म्हणाले, कोरोनामुळे झालेले नुकसान भरून येण्यासाठी आता अधिक उमेदीने, गतीने अर्थकारण आणि समाजजीवन प्रवाहित होण्याची गरज आहे. अशा सन्मानामुळे ही गती अधिक वाढेल.

भगीरथ भालके म्हणाले, कोरोना हा एक आयुष्याला मिळालेला धडा होता आणि यातून समाज जीवनातील एकोपा किती गरजेचा आहे हे समोर आले आहे. यावेळी विठ्ठल जोशी, ह.भ.प. वासकर महाराज यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अनिरुद्ध बडवे यांनी केले. सूत्रसंचालन वैष्णवी बेणारे यांनी केले, तर आभार वैभव बडवे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुभाष बडवे, दर्शन बडवे, श्रीराम बडवे यांनी परिश्रम घेतले.

फोटो

०८पंढरपूर-सत्कार

ओळी

पंढरपुरातील एका कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर आलेले आमदार प्रशांत परिचारक, भगिरथ भालके, समाधान आवताडे आदी.

Web Title: Crisis taught humanity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.