पीक स्पर्धेत महिला शेतकरी अंजू धस पुणे विभागात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:17 AM2021-06-26T04:17:12+5:302021-06-26T04:17:12+5:30
यामध्ये रब्बी ज्वारी पिकाचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या पुणे विभागातील पहिले तिन्ही क्रमांक सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पटकावले आहेत. विभागातील प्रथम ...
यामध्ये रब्बी ज्वारी पिकाचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या पुणे विभागातील पहिले तिन्ही क्रमांक सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पटकावले आहेत. विभागातील प्रथम क्रमांकाच्या शेतकऱ्याला २५ हजार, द्वितीय १५ आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्याला १० हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.
राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या वतीने गहू, हरभरा व करडई या पिकांसाठी हेक्टरी विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी उत्पादकतेच्या आधारावर स्पर्धा घेण्यात आली होती. यात पुणे विभागातील निकाल विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार यांनी जाहीर केले आहेत. त्यामध्ये ज्वारीचे हेक्टरी ८२ क्विंटल ५७ किलो एवढे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या अंजू श्रीहरी धस यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. १ जुलै २०२१ रोजी कृषी दिनाच्या कार्यक्रमांमध्ये सर्व विजेत्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात यावा, असे विभागीय कृषी सहसंचालक यांनी जिल्हा कृषी अधीक्षक आणि तालुका कृषी अधिकारी यांना कळविले आहे.
----
जिल्ह्यातील मानकरी
खवासपुरता सांगोला येथील शेतकरी विष्णू गणपत जरे दुसरा आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले येथील घनश्याम गरड यांनी तिसरा क्रमांक मिळवला आहे. हरभरा पिकात तांदुळवाडी, ता. दक्षिण सोलापूर येथील प्रतिभा कळके यांनी ४९ क्विंटल ४१ किलो उत्पन्न घेत पुणे विभागात द्वितीय आणि बोरामणी येथील केदारनाथ साखरे तिसरा क्रमांक मिळवला आहे.
---
फोटो २५ बार्शी ज्वारी
बार्शी तालुक्यातील धस पिंपळगाव येथील शेतकरी अंजू श्रीहरी धस ह्या ज्वारीच्या शेतात राशीदरम्यान.