राष्ट्रीय अन् खासगी बँकांच्या आखडत्या हातामुळे पीक कर्जाचा आकडा पुढे सरकेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 05:03 PM2021-06-18T17:03:41+5:302021-06-18T17:03:58+5:30

खरीप हंगाम ; जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शंभर टक्के वाटप

Crop credit figures did not move forward due to weak banks | राष्ट्रीय अन् खासगी बँकांच्या आखडत्या हातामुळे पीक कर्जाचा आकडा पुढे सरकेना

राष्ट्रीय अन् खासगी बँकांच्या आखडत्या हातामुळे पीक कर्जाचा आकडा पुढे सरकेना

Next

सोलापूर: खरीप पीक कर्ज वाटपात जिल्हा मध्यवर्ती बँक आघाडीवर आहे. राष्ट्रीय व खासगी बँकांनी हात आखडता घेतल्याने कर्ज वाटपाची आकडेवारी पुढे सरकत नसल्याचे चित्र आहे.

सोलापूर जिल्हा तसा रब्बी असला तरी खरीप हंगामातही पीक कर्जाची मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांकडून मागणी असते. यामुळे खरीप हंगामात पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट वरचेवर वाढत आहे. मात्र घेतलेले कर्ज भरण्यासाठी शेतकरी अनुत्सुक असल्याने बँकांही कर्ज वाटपाबाबत गंभीर नाहीत. जिल्हा मध्यवर्ती बँकेने मात्र खरिपाचे उद्दिष्ट पूर्ण करुन आघाडी घेतली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने मागील आठवड्यापर्यंत १८ हजार ४० शेतकऱ्यांना १३२ कोटी ९० रुपये इतके कर्ज वाटप केले आहे. या बँकेला ९ हजार ९९९ शेतकऱ्यांना १३१ कोटी ७३ लाख ४७ हजार रुपये इतके कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. खरीप हंगामातील पिकांसाठी कर्ज वाटपाची सप्टेंबरपर्यंत मुदत आहे.

राष्ट्रीय बँकांचे कर्ज वाटप मात्र अतिशय सावकाश सुरू आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेनंतर सर्वाधिक ५६ शाखा असलेल्या बँक ऑफ इंडियाने ६ हजार ३५४ शेतकऱ्यांना ८० कोटी ९८ लाख रुपये पीक कर्ज वाटप केले आहे. उद्दिष्टाच्या अवघे २९.२१ टक्के कर्ज बँक ऑफ इंडियाने दिले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने दोन हजार ५३५ शेतकऱ्यांना ५४ कोटी ९० लाख रुपये म्हणजे २६.७२ टक्के कर्ज वाटप केले आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने दोन हजार ४०९ शेतकऱ्यांना ४९ कोटी ६१ लाख, आयसीआयसीआय बँक २९ कोटी, बँक ऑफ बडोदा २७ कोटी, कॅनरा बँक २० कोटी, एचडीएफसी बँक १९ कोटी तर विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने १४ कोटी इतके कर्ज शेतकऱ्यांना दिले आहे.

राष्ट्रीय, खासगी व सहकारी बँकांना खरीप हंगामासाठी

  • एक लाख २० हजार २७९ शेतकऱ्यांना १२७० कोटी ४२ लाख ६१ हजार रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. बँकांनी अडीच महिन्यात ३३ हजार १०२ शेतकऱ्यांना ४४५ कोटी ४६ लाख रुपये इतकी रक्कम वाटप केली आहे. दिलेल्या उद्दिष्टाच्या २७.५२ टक्के खातेदारांना ३५.६ टक्के रक्कम वाटप केली आहे.
  • जिल्हा मध्यवर्ती बँकेने केलेल्या आवाहनानुसार जिल्ह्यातील २७५ शेतकऱ्यांनी थेट कर्ज योजनेसाठी प्रस्ताव दिले आहेत. यापैकी मंगळवेढा व सांगोला तालुके वगळता इतर तालुक्यातील ४९ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. तांत्रिक बाबी पूर्ण करुन १३ शेतकऱ्यांना २२ लाख रुपये कर्ज दिले आहे.

 

Web Title: Crop credit figures did not move forward due to weak banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.