अक्कलकोटसाठी सव्वासात कोटी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:17 AM2021-05-29T04:17:41+5:302021-05-29T04:17:41+5:30
अक्कलकोट : शासनाच्या वतीने विविध योजने अंतर्गत अक्कलकोट नगर परिषदेस ७ कोटी २१ लाख ९२ हजार ८६६ रुपयांचा निधी ...
अक्कलकोट : शासनाच्या वतीने विविध योजने अंतर्गत अक्कलकोट नगर परिषदेस ७ कोटी २१ लाख ९२ हजार ८६६ रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती नगराध्यक्षा शोभाताई खेडगी यांनी दिली.
यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेंतर्गत ४ कोटी ७६ लाख ८५ हजार ९४१ रुपये, नगरोत्थान योजनेंतर्गत १ कोटी १६ लाख १६ हजार ६४३ आणि यात्रा अनुदान योजना अंतर्गत १ कोटी २८ लाख ९० हजार २८२ रुपये असे एकूण ७ कोटी २१ लाख ९२ हजार ८६६ रुपये मंजूर झाले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खा. जयसिद्धेवर म्हास्वामी, माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, मंत्रालयातील नगर विकास सहसचिव पांडुरंग जाधव, नगर विकास उपसचिव सतीश मोघे, अवर सचिव विवेक कुंभार, कक्ष अधिकारी शुभांगी अहिरे, सहायक राहुल जाधव यांच्याशी यासाठी पाठपुरावा झाला.
--
ही आहेत कामे...
राजेराय मठ परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे (२७ लाख २५ हजार ३७२), वाहनतळ विकसित करणे (२५ लाख ५३ हजार ७१०), तारामाता बागेत शौचालय बांधणे (१७ लाख ९५ हजार ९९९), मंगरुळे हायस्कूल बाजूस एलईडी पोल उभारणे (३९ लाख ७० हजार ६९८), हत्ती तलावाजवळ एमएसईबी बायपास चौक, ग्रामीण रुग्णालय, विरक्त मठ येथे हायमास्ट बसविणे (१८ लाख ४४ हजार २८७), अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना, माणिक पेठ जनता चाळ येथे नवीन गटार बांधणे (५४ लाख २ हजार ७१३), किणी रोडपर्यंत गटार बांधणे (१३ लाख १७ हजार ७५३), मैदगी रोड सार्वजनिक शौचालय, कंठेहळ्ळी रोड येथे गटार बांधणे (२० लाख १५ हजार ८२९), भीमनगर येथे उंच पाण्याची टाकी बांधणे (४५ लाख ४५ हजार २००), किणी रोड ग्वल्ल वस्ती येथे बाग विकसित करणे (३७ लाख ९५ हजार ९३६), किणी रोड ग्वल्ल वस्ती येथे जागेभोवती कम्पाउंड वॉल बांधणे (६२ लाख ९३ हजार ९४१), किणी रोड ग्वल्ल वस्ती येथे वॉचमन कॉटर बांधणे (१७ लाख ५७ हजार ६४३), जनता चाळ समाज मंदिर परिसरात काँक्रीटीकरण (२४ लाख ५९ हजार ५९०), ढाले वस्तीमध्ये अंतर्गत रस्ते व गटारी बांधणे (३७ लाख ५१ हजार ४७१), मोरे वस्तीमध्ये अंतर्गत रस्ते व गटारी (६२ लाख २७ हजार ४७७), रुक्मिणी नाईकनवरे घर ते शब्बीर बंवडी घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण (६८ लाख ४५ हजार ७७८), ज्येष्ठ नागरिकांकरिता आसन व्यवस्था (२ लाख ९९ हजार), मैंदगी रोड सार्वजनिक शौचालय व रस्ता काँक्रीटीकरण (७२ लाख ३५ हजार ५१०). हेबळे घर ते हन्नूर रोड रस्ता काँक्रीटीकरण व गटार बांधणे (५० लाख ०५ हजार), भंडारे खानावळ ते किणी रोडपर्यंत रस्ता काँक्रीटीकरण (६६ लाख ११ हजार ६१० रुपये)
--
फोटो : नगराध्यक्षा शोभा खेडगी