संचारबंदी असतानाही पंढरीत भाविकांची गर्दी....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:16 AM2021-07-21T04:16:28+5:302021-07-21T04:16:28+5:30

आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी लाखो भाविक पंढरीत गर्दी करतात. यामुळे कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रसार माेठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. यात्रा ...

Crowd of devotees in Pandharpur despite curfew .... | संचारबंदी असतानाही पंढरीत भाविकांची गर्दी....

संचारबंदी असतानाही पंढरीत भाविकांची गर्दी....

Next

आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी लाखो भाविक पंढरीत गर्दी करतात. यामुळे कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रसार माेठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. यात्रा कालावधीत कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी १८ जुलै ते २५ जुलै अशी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार पंंढरपूर तालुक्यातील ९ गावांतील संचारबंदीचा कालावधी १८ जुलै ते २२ जुलै आहे.

भाविक पंढरपूर शहर व तालुक्यात येऊ नयेत, यासाठी त्रिस्तरीय नाकाबंदी करण्यात आली आहे. पंढरपूर शहर हद्द, तालुका हद्द व सोलापूर जिल्हा हद्दीतच भाविकांना अडविण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र ही त्रिस्तरीय नाकाबंदी तोडून भाविक एकादशीला पंढरीत दाखल झाले होते.

मात्र आषाढी एकादशीची महापूजा उरकून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे गेले की, मंदिर परिसरात बाहेरून आलेल्या भाविकांनी गर्दी केली. त्याचबरोबर बंदोबस्तासाठी आलेले पोलीस कर्मचारी, होमगार्ड, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, कोरोना वाॅरियर्स यांनी देखील नामदेव पायरीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली. भाविकांसह कर्मचाऱ्यांनी सेल्फी घेण्यासाठी विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरीसमोर गर्दी केल्याचे दिसून आले. मात्र बंदोबस्तासाठी असलेले पोलीस हातावर हात धरून बसल्याचे दिसून आले. यामुळे मंदिर परिसरात अधिकच गर्दी झाली. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या नियोजनाप्रमाणे स्थानिक अधिकाऱ्यांनी काम केले नाही. यामुळे अनेकांनी संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन केले. परंतु त्यांच्यावर काहीच कारवाई करण्यात आली नाही.

पोलीस गाडीत नातेवाईंकांना मंदिराजवळ प्रवेश

श्री विठ्ठल-रुक्मिणी आषाढी यात्रेला भाविकांची गर्दी होऊ नये, यासाठी महराष्ट्र राज्य परिवहन व खासगी वाहतूक बंद करण्यात आली आहे. परंतु आपल्या अधिकाराचा गैरवापर करत पाेलीस वाहनातून नातेवाईकांना श्री विठ्ठल मंदिराच्या उत्तर द्वारजवळ आणून सोडण्याचे काम पोलीस अधिकाऱ्यांनी केले आहे.

कोट :::::::::::::::::::

संबंधित प्रकाराची चौकशी करण्यात येईल. संचारबंदी असतानादेखील पोलीस वाहनामध्ये कोणत्या लोकांना आणण्यात आले, याची तपासणी करून संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.

- तेजस्वी सातपुते,

जिल्हा पोलीस अधीक्षक, सोलापूर

फोटो :::::::::::::::::

संचारबंदी असताना देखील विठ्ठल मंदिराच्या श्री संत नामदेव पायरीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी केेलेली गर्दी.

Web Title: Crowd of devotees in Pandharpur despite curfew ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.