लसीकरणासाठी कासेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रावर गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:22 AM2021-05-12T04:22:15+5:302021-05-12T04:22:15+5:30
कासेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारित येणाऱ्या अनेक गावांतील नागरिकही कासेगाव येथे लसीकरणासाठी येत आहेत. लस मिळवण्यासाठी पहाटेपासूनच रांगा लावतानाचे ...
कासेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारित येणाऱ्या अनेक गावांतील नागरिकही कासेगाव येथे लसीकरणासाठी येत आहेत. लस मिळवण्यासाठी पहाटेपासूनच रांगा लावतानाचे चित्र आहे. लसीकरणासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. संध्या पाटील, डॉ. शुभांगी गुंजाळ-तनपुरे, आरोग्य सहायक बी. डी. माने, शिरीष पाटील, आरोग्य साहाय्यक एस. पी. जाधव, औषध निर्माण अधिकारी व्ही. पी. सक्री, प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्रीकांत कुलकर्णी, आरोग्य सेवक दीपक चव्हाण, प्रसाद जवंजाळ, आरोग्य सेविका कमल मोरे, वाय. आर. भोसले, एस. जी. राठोड, के. एस. भूमकर, अशा गटप्रवर्तक देशमुख, नगणे, परिचर धर्मपाल जाधव, अजित लवटे, राणी माने हे प्राथमिक आरोग्य कर्मचारी कार्यरत आहेत.
कोट ::::::::::::::
पूर्वी लसीकरणाची जागरुकता नव्हती. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लोक लसीकरणाला जास्त महत्त्व देत आहेत. यातच मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे.
- प्रशांत देशमुख
माजी उपसभापती, पंचायत समिती, पंढरपूर
कोट :::::::::::::::::
कासेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरू आहे. जास्तीत जास्त लस उपलब्ध होण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सकारात्मक बोलणी झाली आहे.
- वसंतराव देशमुख,
जिल्हा परिषद सदस्य