राष्ट्रवादीच्या बैठकीला ५० हून अधिक कार्यकर्त्यांची गर्दी; पोलिसांत गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:21 AM2021-03-22T04:21:22+5:302021-03-22T04:21:22+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्या विरुध्द कोविडचा गुन्हा दाखल पंढरपूर : मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेतली होती. ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्या विरुध्द कोविडचा गुन्हा दाखल
पंढरपूर : मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेतली होती. मात्र, या बैठकीला ५० हून अधिक कार्यकर्त्यांनी गर्दी केली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भाने अजित पवार यांची २१ मार्च रोजी सकाळी ९ ते १२.३० या कालावधीत पंढरपुरात आढावा बैठक झाली. त्या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे पदाधिकारी संदीप औदुंबर मांडवे (रा. लक्ष्मी टाकळी, ता. पंढरपूर) यांनी २० मार्च रोजी परवानगी घेतली होती. त्यानुसार त्यांना कोविडच्या नियम, अटी व शर्तीची परवानगी मिळाली होती. मात्र, फक्त ५० लोक हे या बैठकीला उपस्थित राहतील, अशी लेखी सूचना देऊन परवानगी देण्यात आली होती. मात्र, या बैठकीस ५० हून अधिक कार्यकर्ते जमले. यामुळे पंचायत समितीचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी नेमलेल्या छायाचित्रीकरण पथक प्रमुख मेघराज काशीनाथ कोरे यांनी संदीप मांडवे यांच्याविरुद्ध कलम १८८ भादंवि अन्वये तक्रार दिल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली.