दोन दिवसानंतर लस उपलब्ध होताच नागरिकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:23 AM2021-04-09T04:23:03+5:302021-04-09T04:23:03+5:30
टेंभुर्णी शहरात एप्रिल महिना चालू झाल्यापासून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. त्यामुळे भयभीत झालेले लोक कोरोना टेस्ट ...
टेंभुर्णी शहरात एप्रिल महिना चालू झाल्यापासून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. त्यामुळे भयभीत झालेले लोक कोरोना टेस्ट करून घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी करत आहेत. १२ फेब्रुवारीपासून लसीकरणास प्रारंभ झाला असून आतापर्यंत १ हजार ७९९ नागरिकांना लस दिली आहे. ६ व ७ एप्रिल रोजी टेंभुर्णी आरोग्य केंद्रात लस उपलब्ध नसल्याने लोकांना लस न घेताच परत जावे लागले होते. गुरुवारी लस आल्याचे कळताच सकाळपासूनच लस घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. याच वेळी कोरोना टेस्ट करण्यासाठी ही नागरिक मोठ्या संख्येने आले. यावेळी कोणीही फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळत नसल्याचे दिसून आले. आरोग्य कर्मचाऱ्यांनी सांगूनही कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. टेस्ट करून घेण्यासाठी आलेले लोक बाहेर उन्हातच थांबले होते तर लस घेण्यासाठी आरोग्य केंद्राच्या आतील बाजूस लोकांनी गर्दी केली होती. आपल्याला लस मिळते की नाही यामुळे लोक गर्दी करत होते. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.
गुरुवारी टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी फक्त २०० लस उपलब्ध झाले असून ते एक-दीड दिवस पुरतील एवढेच आहेत.
चौकट
कोट ::::::::
नागरिकांनी गर्दी न करता रांगेत उभा राहून कोरोना लस घेण्याचे व टेस्ट करून घेण्याचे आवाहन करूनही लोक ऐकत नव्हते. आमच्याकडे कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याने नागरिकांनी स्वत:हून स्वयंशिस्त पाळावी. येथे एक-दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात यावा.
- डाॅ. विक्रम केळकर,
प्राथमिक आरोग्य केंद्र, टेंभुर्णी
फोटो
०८टेंभुर्णी-कोरोना
ओळी
टेंभुर्णी आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी रांगेत बसलेले महिला व पुरुष.