सर्पांचे द्वंद्वयुद्ध पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:37 AM2021-05-05T04:37:21+5:302021-05-05T04:37:21+5:30
नेमतवाडी येथील व्यवहारे यांच्या शेतातील लोकवस्तीत अगदी १०० फुटांच्या अंतरावर ५ ते ६ फूट लांबीच्या दोन सापांचे भांडण सुरू ...
नेमतवाडी येथील व्यवहारे यांच्या शेतातील लोकवस्तीत अगदी १०० फुटांच्या अंतरावर ५ ते ६ फूट लांबीच्या दोन सापांचे भांडण सुरू होते. हे भांडण पहायला नागरिकांची गर्दी झाली होती. दोन सापांचे हे भांडण १५ ते २० फुटाच्या अंतरावरून पहावयास मिळत होते. हे साप भांडणात इतके मग्न होते की, आपल्यावर कोणी हल्ला करेल याचे त्यांना भानही नव्हते. दीड तासाच्या प्रतीक्षेनंतर सर्पांच्या भांडणावर पडदा पडला आणि दोन्ही साप तेथून निघून गेले.
मीलन नव्हे तर दोन सापांचे युद्ध
ग्रामीण भागातील शेतात अनेकवेळा दोन सापांचे युद्ध पहावयास मिळते. एप्रिल-मे महिन्यात ज्या भागात सर्प जातीचे दोन नर आणि एक मादी आहेत अशा भागात निसर्गाच्या नियमानुसार दोन नर जातीच्या सर्पांमध्ये युद्ध होते आणि जो या युद्धात जिंकेल तो मादीबरोबर मीलन करतो. जो हारल तो हा परिसर सोडून दुसऱ्या परिसरात मादीच्या शोधात जातो. अशा प्रकारचा निष्कर्ष निसर्गप्रेमींमधून बांधला जात आहे.
कोट ::::::::::::::::::::::
ग्रामीण भागात शेतात हा प्रकार सतत पहावयास मिळतो. परंतु आजपर्यंत दोन सापांचे मीलन असल्याचा समज आहे.
- सुधीर व्यवहारे
शेतकरी, नेमतवाडी