अर्ज दाखल करण्यासाठी पुरुषांबरोबर महिलांचीही गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:22 AM2020-12-31T04:22:54+5:302020-12-31T04:22:54+5:30
अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या गावातील उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी खासगी तसेच भाड्याचे वाहन घेऊन आणले होते. उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी व ...
अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या गावातील उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी खासगी तसेच भाड्याचे वाहन घेऊन आणले होते. उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी व कार्यकर्त्यांना बसण्यासाठी जागा अपुरी पडत असल्यामुळे अनेक महिला व पुरुष तहसीलदार कार्यालयाच्या आवारातील झाडाखाली बसलेले दिसत होते. तहसील कार्यालयाचे आवार व परिसरामध्ये कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यामुळे पोलीस बंदोबस्त लावला. तसेच पोलीस खात्याने कर्मचारी ठेवून दुचाकी, चारचाकी वाहनांना प्रवेश बंदी केली होती.
तर अनेक उमेदवार ग्रामदैवताच्या पाया पडून अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. निवडणूक ऐन हिवाळ्यात होत असल्यामुळे निवडणुकीला चांगला रंग येणार आहे.
गावगाड्यातील नेत्यांसह उमेदवाराला मतदारांची मनधरणी करावी लागणार आहे.
विद्यमान झेडपी उपाध्यक्ष दिलीप चव्हाण (सलगर बुद्रूक), झेडपी सदस्य नितीन नकाते (बोराळे), सभापती प्रेरणा मासाळ (हुलजंती), माजी सभापती निर्मला काकडे, तानाजी काकडे, उपसभापती सुरेश ढोणे (भोसे), रमेश भांजे (अरळी), माजी उपसभापती दादा गरडे (नंदेश्वर), माजी झेडपी सदस्य नामदेव जानकर (घरनिकी), माजी पंचायत समिती सदस्य संजय पवार यांच्यासह आजी-माजी सदस्यांचा समावेश आहे, तर मुढवी ग्रामपंचयती ही बिनविरोध होण्याचा मार्गावर आहे. सध्या यातील ग्रामपंचायतीवर स्व. आ. भारत भालके, आमदार प्रशांत परिचारक, दामाजीचे अध्यक्ष समाधान आवताडे यांचे वर्चस्व आहे.
गावनिहाय अर्ज
बालाजीनगर, कात्राळ-कर्जाळ, बोराळे, अरळी, तांडोर, सलगर बुद्रूक, लवंगी, डोणज, कचरेवाडी, मुढवी, महमदाबाद शे., घरनिकी, मल्लेवाडी, भोसे, लेंडवेचिंचाळे, मरवडे, सिद्धापूर, हुलजंती, आसबेवाडी, माचणूर, तामदर्डी, गणेशवाडी, नंदेश्वर आधी गावच्या ग्रामपंचायत निवडणुका होणार आहेत.
फोटो ओळी :::::::::::::::::::::
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बुधवारी (दि.३०) उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तहसील आवारामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे छायाचित्र.