शेतकºयांचे शोषण करणाºयांना ठेचून काढणार : सहकारमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 11:13 AM2018-06-23T11:13:49+5:302018-06-23T11:16:06+5:30
सोलापूर बाजार समिती निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू, प्रचाराला आला वेग, आरोप-प्रत्यारोपाची झाली सुरूवात
सोलापूर : बाजार समितीच्या निवडणुकीत मी फक्त कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. ही निवडणूक जिल्ह्याच्या राजकारणाचे परिवर्तन करणारी निवडणूक आहे. शेतकºयांचे शोषण करणाºया औलादींना मी ठेचून काढणार आहे. तुम्हीही या औलादींना दूर ठेवा, असे आवाहन सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील भाजपा प्रणित श्री सिद्धरामेश्वर परिवर्तन पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ (हत्तूर ता. दक्षिण सोलापूर) येथील सोमेश्वर मंदिरात नारळ वाढवून करण्यात आला. यावेळी झालेल्या प्रचारसभेत देशमुख बोलत होते. देशमुख म्हणाले, मी सुडाचं राजकारण केल्याचे विरोधक सांगत आहेत.
मी शरद पवार, सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढविली. मी कुणालाही घाबरलेलो नाही. अश्विनी रुग्णालय कोणी उभे केले हे सर्वांना माहीत आहे. सुडाचं राजकारण करणारी ही औलाद आहे. माझ्या सहकारी मित्रांना दम देण्यात आला. व्यापारी माणसांनी दबक्या आवाजात मला विनंती केली. त्यानंतर हे रुग्णालय कोणी घेतले हे तुम्हाला माहीत आहे. या रुग्णालयाच्या उद्घाटनाला राष्ट्रपतींना बोलावण्यात आले. मग कोण सुडाचं राजकारण करतंय, असा सवालही त्यांनी केला. माझे तीन पत्ते उघडू, अशी भाषा वापरण्यात आली. मी म्हणतो कराच. समाजाचे शोषण करणारी ही मंडळी आहेत.
गेल्या तीन वर्षांत मी कुणाला त्रास दिला का? माझ्या घराचा विषय काढण्यात आला. मी दोषी असेल तर कोणतीही शिक्षा घ्यायला तयार आहे. पण मी बांगड्या भरलेल्या नाहीत. प्रास्ताविक हणमंत कुलकर्णी यांनी केले. यावेळी उमेदवारांची ओळख करुन देण्यात आली. यावेळी महापौर शोभा बनशेट्टी, बाबासाहेब आवताडे, माजी आमदार शिवशरण पाटील, शिवानंद दरेकर, डॉ. चंद्रशेखर हविनाळे यांची भाषणे झाली. दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या सभापती ताराबाई पाटील, संदीप टेळे, इंद्रजित पवार, रजनी भडकुंबे, श्रीमंत बंडगर, रामप्पा चिवडशेट्टी, अण्णाराव बाराचारे, काशिनाथ कदम यांच्यासह दक्षिण तालुक्यातील पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी शेतकºयांचा घात केला : निंबर्गी
- भाजपाचे शहराध्यक्ष अशोक निंबर्गी म्हणाले, कुणी कुठली निवडणूक लढवावी याचे तारतम्य असते. पण पालकमंत्र्यांना ते राहिलेले नाही. तुम्ही भाजपाचे मंत्री असाल तर तुम्ही काँग्रेस आमदारांसोबतच्या बैठकीत निषेध करुन उठायला हवे होते. पण मी आणि माझा मुलगा कायम सत्तेत रहावे यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहिलात. तुम्ही शेतकºयांचा घात करण्याचा प्रयत्न केलात, अशी टीकाही निंबर्गी यांनी पालकमंत्र्यांवर केली. गेल्या चार वर्षांत शेतकºयांच्या मालाला भाव मिळावा म्हणून आवाज उठविलात का? स्वत:च्या जागा सोडवून घेण्यासाठी तुम्ही व्यापाºयांच्या बाजूने बोलत आहात. काल एका माजी नगरसेवकाने आमचे मालक मताला पाच हजार रुपये मोजणार आहेत, अशी भाषा वापरली. कोणते मालक माहीत नाही. पैसा देऊन मते विकत घेणार असाल तर शेतकरी एवढा स्वस्त आहे का? असा सवालही त्यांनी केला.
आता प्रत्येक शेतकरी सोसायटी सभासद
- बाजार समितीत १ रुपयात जेवण देणारे झुणका भाकर केंद्र सुरु केल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात याचा लाभ कुणी घेतला आहे का? हे कागदावरचे झुणका भाकर केंद्र आहे, असेही सहकारमंत्री देशमुख म्हणाले. बाजार समितीत निवडणुकीचा अधिकार दिल्यानंतर प्रत्येक शेतकºयाला सोसायटीचा सभासद करुन घेणार आहे. त्याला कर्ज देण्याची जबाबदारी सोसायटीची असेल.
पालकमंत्री कौरवांच्या बाजूने : पवार
शहाजी पवार म्हणाले, पालकमंत्री आमचे नेते आहेत. ते जिल्ह्याचे मुख्यमंत्री आहेत. महाभारतात कर्णाची महती होती. पण त्याने कौरवाची बाजू घेतली. कौरवाची बाजू घेतली तर काय होतंय हे आपण पाहिलं आहे. तेच आता होणार आहे. राजशेखर शिवदारे यांच्यावरही आरोप झाले. ते स्वाभिमानी आहेत. त्यांनी स्वाभिमानाने माघार घेतली.
ते कोर्ट कचेरीत तरबेज, मताधिकार काढून घेतील
- मागच्या विधानसभा निवडणुकीत कुणी कशी टिंगलटवाळी केली हे सर्वांना माहीत आहे. आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या साक्षीनेच शिवदारे आणि हसापुरे यांनी बाजार समितीतील भ्रष्टाचाराविरोधात तक्रार केली होती. याच आमदार साहेबांनी चंद्रकांतदादांना चौकशी करण्याची विनंती केली होती. ही माणसे कोर्ट कचेरीत तरबेज आहेत. ते कोर्टातून तुमचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतील, अशी मला भीती आहे.