चांगल्या संस्कारांमुळे संस्कृती टिकते
By admin | Published: January 12, 2015 01:17 PM2015-01-12T13:17:05+5:302015-01-12T13:23:11+5:30
वारकरी शिक्षण संस्थेसारख्या संस्थेतून देशभरात चांगली संस्कारमय पिढी निर्माण होईल. चांगल्या संस्कारांमुळे आपली संस्कृती टिकून राहील, असे प्रतिपादन ह.भ.प. प्रभाकर बोधले महाराज यांनी केले.
बाश्री : वारकरी शिक्षण संस्थेसारख्या संस्थेतून देशभरात चांगली संस्कारमय पिढी निर्माण होईल. चांगल्या संस्कारांमुळे आपली संस्कृती टिकून राहील, असे प्रतिपादन ह.भ.प. प्रभाकर बोधले महाराज यांनी केले.
उपळाई रस्त्यावरील वै. ब्र. ह. भ. प. व्यंकटेश मांजरे वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहातील काल्याच्या कीर्तनात भाविकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
शालेय शिक्षण घेतले तरीही मुलांना संस्कारांची गरज आहे, असे सांगून बोधले महाराज म्हणाले, यासाठी अशा वारकरी शिक्षण संस्था महत्त्वाच्या वाटू लागल्या आहेत. चांगले संस्कार घडल्यामुळे कोणी कोणावर अन्याय करणार नाही. आजकाल आई-वडिलांना कोणी विचारत नसल्यामुळे वृद्धाश्रमांचे पेव फुटले आहे. याकरिता पितृ देवो भव, आचार्य देवो भव ही संस्कृती शिकविण्याची गरज निर्माण होत आहे. मुलांवर चांगल्या संस्कारांमुळेच संस्कृती टिकणार आहे आणि संस्कृती टिकल्याने देश टिकेल, असे त्यांनी सांगितले.
यानिमित्त ह. भ. प. नवनाथ साठे, गोपीनाथ बानगुडे, रामभाऊ निंबाळकर, अँड. पांडुरंग लोमटे , संतोष लहाने, श्रीहरी यादव, विठ्ठल मुंढे यांची कीर्तनसेवा झाली. हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी संजय पवार, प्रकाश मांजरे, सुरेश तावरे, तुकाराम जगताप, अशोक जगदाळे, तुकाराम जगदाळे, श्रीराम येळे यांच्यासह गोंदिल प्लॉटमधील तरुण मंडळी व वारकरी संस्थेच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)