नऊ गावांमध्ये आता चार दिवसच संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:16 AM2021-07-16T04:16:45+5:302021-07-16T04:16:45+5:30

शासनाने चालू वर्षी आषाढी वारीसाठी मानाच्या १० पालख्यांच्या पादुकांना ठराविक वारकऱ्यांच्या उपस्थितीत १९ जुलै रोजी पंढरपूरमध्ये येण्यास परवानगी ...

Curfew has been imposed in nine villages for four days now | नऊ गावांमध्ये आता चार दिवसच संचारबंदी

नऊ गावांमध्ये आता चार दिवसच संचारबंदी

Next

शासनाने चालू वर्षी आषाढी वारीसाठी मानाच्या १० पालख्यांच्या पादुकांना ठराविक वारकऱ्यांच्या उपस्थितीत १९ जुलै रोजी पंढरपूरमध्ये येण्यास परवानगी दिली आहे. पादुका ठराविक लोकांसमवेत वाखरी (ता. पंढरपूर) येथे आल्यावर दरवर्षीप्रमाणे यावर्षी पादुकांसोबत गर्दी राहणार नाही. यामुळे पंढरपूर शहरातील व शहरास लागून असलेल्या भटुंबरे, चिंचोळी भोसे, शेगाव दुमाला, लक्ष्मी टाकळी, गोपाळपूर, वाखरी, कोटी, गादेगाव, शिरढोण, कौठाळी या गावांतील लोक हे पादुकांच्या दर्शनासाठी वाखरी व पालखी मार्गावर एकत्र येण्याची शक्यता आहे.

त्याचबरोबर पादुका विठ्ठल मंदिराकडे जात असताना शहरातील व आजूबाजूच्या परिसरातील छोट्या मार्गांवरून किंवा चोरट्या मार्गाने लोक पादुकांच्या दर्शनासाठी गर्दी करू शकतात. यामुळे १७ जुलै ते २५ जुलैच्या सकाळी या कालावधीत पंढरपूरकडे जाणारी व येणारी एस.टी. सेवा, खाजगी बससेवा बंद करण्यात आली आहे. शासनाने आखून दिलेल्या नियमांचे कोणी उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

:::::

असा आहे संचारबंदीच्या कालावधीतील बदल

पंढरपूर शहर व गोपाळपूरमध्ये १८ जुलैच्या सकाळी ६ वाजेपासून २४ जुलैच्या सायंकाळी ४ वाजेपर्यंत अशी ६ दिवस संचारबंदी लागू केली आहे. पंढरपूर शहरातील नगरप्रदक्षिणाच्या आतील बाजूस, सर्व घाट, वाळवंट परिसर, मंदिर परिसरामध्ये १८ जुलै रोजीच्या सकाळी ६ वाजेपासून २४ जुलैच्या सायंकाळी ४ वाजेपर्यंत, अशी ७ दिवस संचारबंदी असेल.

पंढरपूर तालुक्यातील भटुंबरे, चिंचोळी भोसे, शेगाव दुमाला, लक्ष्मी टाकळी, वाखरी, कोर्टी, गादेगाव, शिरढोण व कौठाळी या ग्रामपंचायत हद्दीत १८ जुलैच्या सकाळी ६ वाजेपासून २२ जुलैच्या सकाळी ६ वाजेपर्यंत, अशी ४ दिवस संचारबंदी करण्यात आली आहे.

Web Title: Curfew has been imposed in nine villages for four days now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.