अक्कलकोटमध्ये संचारबंदीचा उडाला बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:21 AM2021-04-16T04:21:43+5:302021-04-16T04:21:43+5:30
गतवर्षी झालेल्या लॉकडाऊनपेक्षा यंदाचे वेगळे. यामुळे नागरिकानी फारसे गंभीर्याने घेतले नसल्याचे दिसून आले. किराणा दुकान, डेअरी, मेडिकल, भाजीपाला, ...
गतवर्षी झालेल्या लॉकडाऊनपेक्षा यंदाचे वेगळे. यामुळे नागरिकानी फारसे गंभीर्याने घेतले नसल्याचे दिसून आले. किराणा दुकान, डेअरी, मेडिकल, भाजीपाला, आडत बाजार, खत-बीबीयाणे दुकाने, पेट्रोलपंप, खरेदी विक्री कार्यालय अशा एक ना अनेक प्रकारचे दुकाने सुरू आहेत. तसेच टमटम, बसही सुरू आहेत. यामुळे बंदची संख्या अल्प आहेत. म्हणून शहरात नेहमीप्रमाणे नागरिकांनी गर्दी केलेली दिसून आले.
ज्याचे दुकाने बंद आहेत असे दुकानदार चालक, मालक दुकानासमोर ठाण मांडून बसलेले होते. दिवसभरात लहान मोठे व्यापार करीत होते. केवळ कारवाईचे भीती असणारे बोटावर मोजण्याएवढी मंडळी संचारबंदीचे पालन करित असल्याचे दिसून आले.
एसटी स्टॅण्ड परिसर, विजय कामगार चौक, मल्लिकार्जुन मंदिर, बुधवार पेठ, कारंजा चौक, नॉर्थ पोलीस ठाणे परिसर, खरेदी विक्री कार्यालय समोर, मेन रोड, जुना आडत बाजार, फत्तेसिंह चौक, एवन चौक, नगरपालिका कार्यालय परिसर, जुना पोस्ट ऑफिस भाग मंगरुळे चौक, अशा अनेक ठिकाणी नागरिक बेफिकरणपणे गप्पा मारत रस्त्यावर दिसून आले. त्यांना कोणी विचारणाही केली नाही.
---
ग्रामीण भागात प्रतिसाद
अक्कलकोट शहरात संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी बोजवारा उडाल्याचे चित्र दिसून आले. या उलट ग्रामीण भागातील मैंदर्गी, दुधनी, जेऊर, करजगी, मंगरूळ,तडवळ, नागणसुर, वागदरी, शिरवळ, चप्पळगाव अशा मोठमोठ्या गावात दोन दिवसांपासून संचारबंदीचे कडक पालन करीत असल्याचे दिसून आले.
----
दुकाने बाहेरुन बंद आतून उघडे
ज्यांना दुकाने उघडण्याचे परवाना नाही, अशांनी बाहेरुन शटर बंद ठेऊन आत व्यवहार सुरु असल्याचेही निदर्शनास आले. यासाठी दुकानासमोर कोणीतरी एक माणूस ठाण मांडून बसलेले पहायला मिळाले. रजिस्टर कार्यालयासमोर ना मास्क,ना सामाजिक अंतर काहीच सोयरसुतक नसलेले लोक मोकाट फिरताना दिसून आले. गुढी पाडव्यादिवशी बुधवार पेठ येथे स्वामी समर्थ समाधी मठात भाविकांची तोबा गर्दी होती. मोकाटपणे फिरणे, जागोजागी गप्पा मारत बसणे,प्रकार वाढले आहेत.
१५अक्कलकोट०१
अक्कलकोट येथे संचारबंदीच्या आदेशाला केराची टोपली दाखवत नागिरक मोकटपणे शहरात वावरताना दिसत आहेत.
----