विद्यमान आमदारांची दिल्ली स्वारी, माजी आमदारांची मुंबई वारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:23 AM2021-09-11T04:23:24+5:302021-09-11T04:23:24+5:30
माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे १७ वर्षे तालुक्याचे नेतृत्व केले आहेत. त्यांच्या काळात अनेक कामे मार्गी लागल्या आहेत. काही निधीअभावी ...
माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे १७ वर्षे तालुक्याचे नेतृत्व केले आहेत. त्यांच्या काळात अनेक कामे मार्गी लागल्या आहेत. काही निधीअभावी अर्धवट आहेत. काही कामे तांत्रिक कारणामुळे रखडले आहेत. आता तालुक्यातील कामे मार्गी लावण्यासाठी तालुक्यातील नेत्यांमध्ये चढाओढ लागली आहे. विद्यमान आमदार कल्याणशेट्टी हे पहिल्यांदाच तालुक्याचे नेतृत्व करीत आहेत. राज्यात भाजपाची सत्ता आली नाही. त्यामुळे कामे करताना अचडणी येणार हे ओळखून कल्याणशेट्टी केंद्रातील मंत्र्यांवर भिस्त ठेऊन विकासकामे मार्गी लावण्याचा खटाटाेप करीत आहेत. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची वारंवार भेट घेऊन रस्ते बांधणीसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणले. तालुक्याला अनेक महामार्ग जोडले जात आहेत. नुकतेच नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांची भेट घेऊन बोरामणी विमानतळासाठी निधी मागणी केली आहे. विमानतळाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. सिंधीया यांनीही निधी देण्याचा शब्द दिला आहे. याशिवाय राज्यातील महाविकास आघाडीच्या मंत्र्यांची ते भेट घेत आहेत.
माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे हेही गेल्या काही दिवसांपासून मुंबईची वारी वाढविली आहे. कोरोनाशी चार हात करून सध्या म्हेत्रे तालुक्यात पुन्हा सक्रिय झाले आहेत. राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारचा फायदा मतदारसंघासाठी घेण्यासाठी मंत्रालयात फिरत आहेत. नुकतेच त्यांनी सहा मंत्र्यांची भेट घेऊन विकासकामांसाठी निधींची मागणी केली. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना भेटून बहुचर्चित देगाव जोडकालवा, एखरुख योजना या अपूर्ण योजना पूर्ण करण्यासाठी १०० कोटींची मागणी केली. ओबीसी आरक्षणाविषयी पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना भेटले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, यांचीही भेट घेत निधीची मागणी केली. इकडे तालुक्यातही मेळावे, विकामकामांच्या उद्घाटनांवर जोर देण्यात येत आहे. त्यामुळे तालुक्यातील राजकारण सध्या ढवळू निघत आहेत.
....................
तानवडे, खेडगी यांचे भिस्त माजी पालकमंत्र्यांवर
जिल्हा परिषदेचे सदस्य आनंद तानवडे व मुत्तू खेडगी दोघेही माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे समर्थक मानले जातात. आमदार कल्याणशेट्टी यांच्याशी पटत नसल्याने दोघेही आमदार विजयकुमार देशमुख यांच्या माध्यमातून निधी खेचून आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. जिल्हा परिषदेतील विविध हेडमधून निधी आणत वागदरी परिसरातील गावांना निधी देत आहेत. शिवाय खेडगी हेही मंत्रालयातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन शहरासाठी निधी आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.
.........
फोटो बातमीत कल्याणशेट्टी व म्हेत्रे व चौकटीत तानवडे, खेडगी यांचे फोटो)