बार्शीत रविवारी सीताफळ उत्पादन व तंत्रज्ञान चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:25 AM2021-09-23T04:25:18+5:302021-09-23T04:25:18+5:30
बार्शी : येथील मधुबन फार्म अँड नर्सरी आणि लायन्स क्लब बार्शी टाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने २६ सप्टेंबर, ...
बार्शी : येथील मधुबन फार्म अँड नर्सरी आणि लायन्स क्लब बार्शी टाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने २६ सप्टेंबर, २०२१ रोजी बार्शी येथे शेतकरी मेळावा आणि मोफत सीताफळ उत्पादन व तंत्रज्ञान चर्चासत्र आयोजित केले आहे. आयोजन करण्यात आले असून, यासाठी कोणतीही शुल्क आकारले जाणार नाही.
बार्शी येथे परंडा बायपास चौकात असलेल्या मधुबन फार्म ॲन्ड नर्सरीच्या परिक्षेत्रात सकाळी ९ वाजता हा शेतकरी मेळावा आणि चर्चासत्र होत आहे. या चर्चासत्रात राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांतकुमार पाटील ऑनलाइन सहभागी होणार असून, विद्यापीठाचे तज्ज्ञ डॉ.संजय पांढरे प्रत्यक्ष उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. डॉ.नवनाथ कसपटे हे कीडरोग व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
या मेळाव्यात ४२ सीताफळ वाणांची प्रक्षेत्रावरील लागवड, तसेच सीताफळ पीक उत्पादनाची विविध प्रात्यक्षिके पाहावयास मिळणार आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन रवींद्र कसपटे व प्रवीण कसपटे यांनी केले आहे.