संतनगरीतून वारी परिवाराचे सायकलस्वार रायगडकडे रवाना

By दिपक दुपारगुडे | Published: November 16, 2023 01:35 PM2023-11-16T13:35:19+5:302023-11-16T13:36:08+5:30

वारी परिवार सायकल क्लबकडून सायकलस्वार रायगडकडे रवाना झाले आहेत. 

cyclists of the wari family left for raigad from santnagari | संतनगरीतून वारी परिवाराचे सायकलस्वार रायगडकडे रवाना

संतनगरीतून वारी परिवाराचे सायकलस्वार रायगडकडे रवाना

दीपक दुपारगुडे, सोलापूर : दुर्गराज रायगड संवर्धन व पर्यटन विकास जनजागृतीसाठी आयोजित केलेल्या मंगळवेढा ते रायगड ऐतिहासिक सायकल मोहिमेसाठी १६ नोव्हेंबर रोजी मंगळवेढा येथून वारी परिवार सायकल क्लबकडून सायकलस्वार रायगडकडे रवाना झाले आहेत. 

चार दिवसाच्या ऐतिहासिक सायकल मोहीमेत पंढरपूर-वेळापूर-माळशिरस-नातेपूते-फलटण-शिरवळ-भोर-वरंध-महाड-पाचाड-रायगड या मार्गावरती गडकोट स्वच्छता व संवर्धन विषयी जनजागृतीपर पत्रके वाटण्यात येणार आहेत.  पाचाड याठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊंच्या समाधीस्थळी पूजन करून दिपोत्सव साजरा करण्यात येणार आहे.  तसेच रायगडावरील जगदीश्वर मंदीर, बाजापेठा, छत्रपती शिवरायांची समाधी, राजवाडा, वाडे, महादरवाजा, शिरकाई मंदीर, राजदरबार, अष्टप्रधान वाडे व सप्त मंजिली बुरुज आदि ठिकाणांना भेटी देऊन तरूणांना वैभवशाली इतिहासाची ओळख करून दिली जाणार आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी देखील होळीच्या माळावर दिमाखात उभ्या असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास साकडे घालण्यात येणार आहे.  

ऐतिहासिक सायकल मोहीमेत सुहास ताड, चंद्रकांत शहा, दत्तात्रय आसबे, सिद्धेश्वर डोंगरे, पवन टेकाळे, समर्थ महामूनी, रोहन सुर्यवंशी, भारत नागणे, स्वराज कलुबर्मे, सौरभ मुढे, हर्षद वस्त्रे, संजय जावळे, रोहित वाघ, पांडूरंग कोंडूभैरी, प्रा विनायक कलुबर्मे आदी सायकलस्वार सहभागी झाले आहेत. यावेळी अजित जगताप, राजेंद्र मेढे, विजय पवार, राजेंद्र गायकवाड, राजाराम सूर्यवंशी, प्रकाश मुळीक, विलास अवताडे, शिवाजी वाकडे, महेश वाकडे उपस्थित होते.

Web Title: cyclists of the wari family left for raigad from santnagari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड