डी. एन. गायकवाड यांचे कोरोनाने निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:21 AM2021-03-24T04:21:02+5:302021-03-24T04:21:02+5:30
सोलापूर : बाजार समितीचे माजी संचालक डी. एन. गायकवाड यांना तीन दिवसांपासून अंगात कणकण जाणवत होती. कोरडा खोकला होता. ...
सोलापूर : बाजार समितीचे माजी संचालक डी. एन. गायकवाड यांना तीन दिवसांपासून अंगात कणकण जाणवत होती. कोरडा खोकला होता. कोरोना चाचणी होण्याच्या भीतीने त्यांनी घरातच राहणे पसंत केले, जुजबी औषधे घेऊन वेळ मारुन नेणे त्यांचा चांगलेच महागात पडले. शनिवारी कुटुंबीयांन सक्तीने त्यांना रुग्णालयात दाखल केले असाता टेस्ट पॉझिटिव्ह आली, तोपर्यंत आजार बळावत गेल्याने एकेक अवयव निकामी हाेत गेले आणि अवघ्या ४८ तासात त्यांना प्राण गमवावा लागला. इतरांच्या आजाराची काळजी घेत डी. एन. गायकवाड वर्षभर कोरोनाविषयक जनजागृती करीत होते. परंतू त्यांनी स्वत: फारशी काळजी घेतली नाही. ते २० वर्षे हिप्परगा ग्रामपंचायतीचे सरपंच होते. बाजार समितीचे १० वर्षे संचालक होते. रिपाईच्या आठवले गटाच्या पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्याकडे होती.