आबा गेले; ११ वेळा आमदार राहिलेले गणपतराव देशमुख एसटीने प्रवास करायचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 10:45 PM2021-07-30T22:45:20+5:302021-07-30T22:45:50+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Dad is gone; Ganapatrao Deshmukh, who has been an MLA for 11 times, used to travel by ST | आबा गेले; ११ वेळा आमदार राहिलेले गणपतराव देशमुख एसटीने प्रवास करायचे

आबा गेले; ११ वेळा आमदार राहिलेले गणपतराव देशमुख एसटीने प्रवास करायचे

googlenewsNext

सोलापूर : शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे आज रात्री नऊच्या सुमारास सोलापूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. देशमुख यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्य़ातील सांगोला मतदारसंघातून ११ वेळा विक्रमी विजय मिळविला आहे. ११ वेळा आमदार राहिलेले गणपतराव देशमुख साहेब एसटीने प्रवास करायचे.


२००९ च्या निवडणुकीत विजय मिळवून, करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले होते.
अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतरावांनी तब्बल ५४ वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले आहे. यंदाच्या निवडणुकीत त्यांनी ९४ हजार ३७४ मते मिळवून शिवसेनेचे शहाजीबापू पाटील यांचा २५ हजार २२४ मतांनी पराभव केला. 


देशमुख हे सांगोल्यात सर्वप्रथम १९६२च्या निवडणुकीत विजयी झाले. त्यानंतर १९७२ आणि १९९५चा अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत सांगोल्यातील मतदारांनी त्यांनाच भरभरून मते दिली. २०१२मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागास ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सभागृहाने तसेच सरकारने त्यांचा गौरव केला होता.

गणपतराव देशमुख हे बहुतांश काळ विरोधी बाकांवरच होते, मात्र १९७८मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापले तेव्हा आणि १९९९मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हा, अशा दोन वेळा गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता.

Web Title: Dad is gone; Ganapatrao Deshmukh, who has been an MLA for 11 times, used to travel by ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.