बाप रे...११० किलो वजनाची सापडलेली मगर उजनीलगतच्या वनक्षेत्रातच सोडली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 12:59 PM2019-12-04T12:59:19+5:302019-12-04T13:01:00+5:30

परिसरात भीतीचे वातावरण; कात्रज येथे मगर ठेवण्यासाठी उपाययोजना नसल्याचे दिले कारण

Daddy ... a crocodile weighing 5kg was left in the forest area of Ujjain | बाप रे...११० किलो वजनाची सापडलेली मगर उजनीलगतच्या वनक्षेत्रातच सोडली 

बाप रे...११० किलो वजनाची सापडलेली मगर उजनीलगतच्या वनक्षेत्रातच सोडली 

Next
ठळक मुद्देचार दिवसांपूर्वी भीमानगर परिसरात महाकाय मगर सापडली मच्छीमार आणि शेतकरी यांनी सुटकेचा नि:श्वास सोडलामहाकाय मगर वनविभागाने पुन्हा उजनी किनारी असणाºया वनविभागाच्या अधिवासात सोडली

सोलापूर/ भिगवण : उजनी धरणात मगर आहे, अशा चर्चा मागील  दोन वर्षांपासून होत होत्या. चार दिवसांपूर्वी भीमानगर परिसरात महाकाय मगर सापडली आणि मच्छीमार आणि शेतकरी यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र ती महाकाय मगर वनविभागाने पुन्हा उजनी किनारी असणाºया वनविभागाच्या अधिवासात सोडली आहे. तसेच ही मगर कोणत्या ठिकाणी सोडली, हे मात्र वनविभागाने सांगितले नाही. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील वनक्षेत्रानजीक असणाºया परिसरामध्ये भीतीचे वातावरण आहे. 

उजनी धरणातील पाण्यात मगरी आढळत असल्याच्या चर्चा गेल्या दोन-तीन वर्षांपासून होत आहेत. करमाळा तालुक्यातील कंदर येथे मच्छीमारीच्या जाळीत मगर अडकली होती तर उजनी येथील भीमानगर येथील मत्स्य केंद्राच्या तळ्यामध्ये मगरी असल्याची माहिती मिळत होती तर इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव, तक्रारवाडी आणि डिकसळ परिसरातही मच्छीमारांना मगरीने दर्शन दिले असल्याची माहिती मिळत आहे, असे असताना दोन दिवसांपूर्वी १२ फूट लांब आणि जवळपास १५० ते २०० किलो वजनाच्या महाकाय मगरीला भोई समाजातील महादेव नगरे, मामू भोई, नितीन सल्ले, अशोक पतुले, रवींद्र नगरे या मच्छीमार तरुणांनी जीवाची बाजी लावून पकडण्यात यश मिळविले होते. तसेच या महाकाय मगरीला पकडून वनविभागाच्या हवाली करण्यात आले होते. 

मात्र वनविभागाने ही मगर धुमाळवाडी येथील उजनीशेजारील वनक्षेत्रात सोडल्याची माहिती मिळाल्याने शेतकरी तसेच मच्छीमार धास्तावून गेल्याचे सांगण्यात येत  आहे. 

पर्यटकांसह शेतकºयांमध्ये पसरली भीती
- या ठिकाणी देशभरातून अनेक पर्यटक परदेशी पक्ष्यांना पाहण्यासाठी येत असतात. त्यांच्या जीवितालाही धोका असल्याचे बोलले जात आहे. मगर या भागात सोडल्याच्या माहितीमुळे शेतकरी शेताला पाणी देण्यास जाण्यासाठी घाबरू लागल्याचे सांगितले जात आहे. उजनी धरणाच्या किनारी असणाºया वनविभागाच्या क्षेत्रालगत अनेकांची बागायत शेती असून, जर वनविभागाने या ठिकाणी मगर सोडली असेल तर ते अत्यंत धोक्याचे असल्याचे सांगितले. तर वन्यजीव महत्त्वाचे असले तरी त्याचा मानवी जीवनावर धोका असेल तर याचा शासनाने विचार करणे गरजेचे असल्याचे सांगितले.

मगर इंदापूर तालुक्यातील वनक्षेत्रात मुक्त केली असल्याचे सांगितले. मात्र ती मगर नक्की कोणत्या ठिकाणी सोडली, हे सांगता येणार नाही. तसेच सापडलेल्या मगरीवर उपचार करण्यासाठी राजीव गांधी अनाथालयातील पथक आले होते. मात्र कात्रजला ठेवण्यासाठी उपाययोजना नसल्यामुळे तसेच वन्यजीव कायद्यानुसार मगर वनविभागाच्या अधिवासात सोडली.
- राहुल काळे
वनपरिक्षेत्र अधिकारी, इंदापूर 

वनविभागाने उजनी किनारी असणाºया वन क्षेत्रात मगर सोडली असल्याची माहिती काही मच्छीमार बांधवांनी दिली आहे. यातून मच्छीमारांच्या जीविताला धोका पोहोचू शकतो आणि याची जबाबदारी वनविभाग घेणार आहे का? अशाप्रकारे मगर सोडल्याचे निष्पन्न झाल्यास मच्छीमार आंदोलन करणार आहेत. 
- नंदकुमार नगरे, 
महाराष्ट्र राज्य संघर्ष कृती समिती

Web Title: Daddy ... a crocodile weighing 5kg was left in the forest area of Ujjain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.