दहिगाव सिंचननं लव्हेचा विठोबा तलाव भरला; सुवासिनींनी पूजन करुन आनंद व्यक्त केला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:21 AM2021-03-21T04:21:18+5:302021-03-21T04:21:18+5:30
दहिगाव उपसा सिंचन योजना २०१७ मध्ये सुरू झाली, तेव्हापासून या तलावाला दहिगावचे पाणी प्रत्येक आवर्तनात कमी-अधिक प्रमाणात मिळत होते. ...
दहिगाव उपसा सिंचन योजना २०१७ मध्ये सुरू झाली, तेव्हापासून या तलावाला दहिगावचे पाणी प्रत्येक आवर्तनात कमी-अधिक प्रमाणात मिळत होते. माजी आमदार नारायण पाटील यांचे हे गाव असल्यामुळे त्यांच्या कार्यकाळात हा तलाव पूर्ण क्षमतेने भरू शकला नाही; त्यामुळे इथून पुढे हा तलाव पूर्ण क्षमतेने भरणे अशक्य असल्याची भावना गावातील नागरिकांच्या मनात तयार झाली होती; परंतु या वर्षी मार्च २०२१ मध्ये हा तलाव १०० टक्के भरल्याचा आनंद ग्रामस्थांनी जल्लोष करून व्यक्त केला.
या पाण्याचे पूजन सरपंच रंजना विलास पाटील, मनीषा कवडे, सिंधू कवडे, कलावती कवडे, रंजना भांगे, राजूभाई भांगे, स्वाती भांगे, उषा भांगे, सुवर्णा भांगे, द्रोपदा कवडे, ज्योती भांगे, सुमन भांगे, नंदा भांगे, कांताबाई भांगे, नंदाबाई भांगे, वैशाली भांगे, ऋतुजा कवडे या महिलांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी पैलवान माणिक दादा पाटील, आमदार संजयमामा शिंदे यांचे स्वीय साहाय्यक डॉ. विकास वीर, युवा नेते रवींद्र वळेकर, खंडू भांगे, हनुमंत कवडे, मोहन भांगे, विलास भांगे, प्रदीप भांगे, अमोल भांगे, नवनाथ भांगे, दगडू भांगे, देविदास भांगे, सोमनाथ ढोले, रामेश्वर ढोले, गहिनीनाथ भांगे, विकास ढोले, परमेश्वर कवडे, देविदास भांगे उपस्थित होते.
२० करमाळा-तलाव पूजन
लव्हे येथील विठोबा तलाव दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या पाण्याने प्रथमच भरल्याने महिलांनी पाण्याचे विधीवत पूजन केले.