सोलापूर स्मार्ट सिटीतील दररोजचा पाणीपुरवठा होणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 02:11 PM2018-11-13T14:11:45+5:302018-11-13T14:14:12+5:30

हिप्परग्याची पातळी खालावली: उन्हामुळे वाढली पाण्याची मागणी

Daily water supply will be done in Solapur Smart City | सोलापूर स्मार्ट सिटीतील दररोजचा पाणीपुरवठा होणार बंद

सोलापूर स्मार्ट सिटीतील दररोजचा पाणीपुरवठा होणार बंद

Next
ठळक मुद्दे स्मार्ट सिटी अंतर्गत शहराला (एबीडी एरिया) दररोज पाणीपुरवठा करण्याचे प्रस्तावितहिप्परग्याची पातळी घटल्यामुळे बदल करणे अपरिहार्य असल्याचे अधिकाºयांनी सांगितले

सोलापूर : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत एबीडी एरियात (जुने गावठाण) दररोज पाणीपुरवठा करण्याच्या प्रकल्पांतर्गत गोलचावडी व नवीपेठ भागात आॅगस्टपासून करण्यात येत असलेल्या दररोज पाणीपुरवठ्यावर गंडांतर येणार आहे. हिप्परग्याची पातळी घटल्यामुळे बदल करणे अपरिहार्य असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. 

 स्मार्ट सिटी अंतर्गत शहराला (एबीडी एरिया) दररोज पाणीपुरवठा करण्याचे प्रस्तावित आहे.  त्याप्रमाणे गावठाण हद्दीतील भागात दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. त्याप्रमाणे प्रायोगिक तत्त्वावर दोन भागात दररोज पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यामध्ये दयानंद कॉलेज पाण्याच्या टाकीवरून जुनी गोलचावडी परिसर, जोडभावी पेठ, मंगळवार बाजार परिसर, कुंभार वेस, काशीकापडे गल्ली, चाटी गल्ली, गोल व बोरामणी तालीम, वडार गल्ली परिसरातील काही भागांचा समावेश आहे.  

दुसरा भाग उजनी जलवाहिनीवरून निवडण्यात आला आहे. पाकणी जलशुद्धीकरण केंद्रातून कोंडी एमबीआर ते शहरातील पाण्याच्या टाक्यांना जलवाहिन्या जोडण्यात आल्या आहेत. कोंडी एमबीआरवरून येणाºया जलवाहिनीला जुना पुणे नाका येथे एक दुसरी जलवाहिनी जोडलेली आहे. या जलवाहिनीवरून शिवशक्ती हॉटेल परिसर, दक्षिण व उत्तर कसबा, नवीपेठ, पत्रा तालीमच्या भागापर्यंत दररोज पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले. त्याप्रमाणे ८ आॅगस्टपासून या भागात दररोज अर्धा तास पाणी देण्यात येत आहे.

गेल्या महिनाभरात विजेचा व्यत्यय, औज बंधारा कोरडा, जलवाहिनीत बिघाड यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.  या काळात दररोजच्या पाणीपुरवठ्याच्या प्रयोगावरही परिणाम झाला. गेल्या एक महिन्यापासून उन्हाचा कडाका वाढला आहे व पाणी वितरणाचे दिवस वाढले आहेत. यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे पाणी वितरणाचे नियोजन करणे जड जात आहे. 
--------------

  • - हिप्परगा तलावाची पातळी खालावली आहे. दुबार पंपिंगद्वारे आता दररोज केवळ १ एमएलडी (दशलक्ष लिटर) पाणी उपलब्ध होत आहे. पाणी गिरणीची क्षमता २२.५ एमएलडी इतकी आहे. त्यामुळे कमी पडणारे पाणी उजनी जलवाहिनीवरून घेण्यात येत आहे. उजनी जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह बदलल्यानंतर वाढलेले पाणी या नियोजनात जात आहे. त्यामुळे आता लवकरच दररोजचा पाणीपुरवठा बंद करावा लागणार अशी चिन्हे आहेत.

--------------
दोन दिवसाआड अशक्य
- आयुक्त डॉ.अविनाश ढाकणे यांनी जलवाहिन्याचे जोड पूर्ण झाल्यावर व अमृतमधील कामे पूर्ण झाल्यावर पाणी वाढणार असे सांगितले होते. यातून डिसेंबरनंतर दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे सुतोवाच त्यांनी केले होते. पण आता निर्माण झालेली परिस्थिती पाहता तीन दिवसाआड शहराला पाणीपुरवठा होणे अशक्य झाले आहे. त्यामुळे दोन दिवसाआडच्या प्रयोगाबाबत साशंकता व्यक्त होत आहे.  

Web Title: Daily water supply will be done in Solapur Smart City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.