दुग्धव्यवसाय अडचणीत; दुधाचे दर घटले अन् खाद्याचे दर वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 01:07 PM2020-04-25T13:07:46+5:302020-04-25T13:08:55+5:30

कोरोनाचे दुष्टचक्र;  शेतीपूरक व्यवसाय अडचणीत ; शासनाचे अन्नदात्याकडे मात्र दुर्लक्ष

Dairy in trouble; Milk prices fall, food prices rise | दुग्धव्यवसाय अडचणीत; दुधाचे दर घटले अन् खाद्याचे दर वाढले

दुग्धव्यवसाय अडचणीत; दुधाचे दर घटले अन् खाद्याचे दर वाढले

Next
ठळक मुद्देसध्या लॉकडाउनमुळे व आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडरचे दर घसरल्यामुळे दुधाचे दर अतिशय कमी झालेसंपूर्ण दुग्धव्यवसाय अडचणीत आला आहे. शासनाने मागील वर्षी मंजूर केलेले अनुदान त्वरित शेतकºयांच्या खात्यात जमा करावे

इरफान शेख 

कुर्डूवाडी : कमी पाण्याच्या भागात शेतकºयाच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावणारा दुग्धव्यवसाय कोरोनाच्या संकटामुळे पुन्हा अडचणीत आला आहे. गेल्या १२ महिन्यांत वेगवेगळ्या कारणांनी तीन वेळा दुग्धव्यवसाय अडचणीत आला आहे. लॉकडाउनमुळे बहुतांश शेतकºयांचा शेतीमाल शेतातच पडून आहे. शेतीपूरक जोडधंद्यातील तांत्रिक अडचणीमुळे शेतकºयाचा आर्थिक कणा मोडला आहे. आर्थिक दुर्बल घटकांना अन्नधान्याची मदत करत असताना शासनाचे अन्नदात्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे.

 मार्च २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडरचे दर वाढले़ परिणामत: दुधाचे दर वाढले़ यामुळे शासनाकडून मिळणारे अनुदान ३ एप्रिलपासून बंद करण्यात आले होते. १ फेब्रुवारी ते ३० एप्रिल २०१९ पर्यंतचे अनुदान दूध उत्पादक शेतकºयाच्या खात्यावर जमा झाले नव्हते. अगदी त्यावेळेप्रमाणेच दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था सद्यस्थितीत झाली आहे.

 माढा तालुक्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल दुधाच्या माध्यमातून होते. दुष्काळामुळे शेतकºयांची जनावरे छावणीत ठेवण्यात आली होती. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील उसाशिवाय दूध उत्पादकांसमोर वैरणीसाठी दुसरा पर्याय नव्हता. शिवाय छावणीमध्ये मिळणारा ऊस पुरेसा नाही़ यामुळे ३ हजार ते ३ हजार २०० रुपये प्रति टन दराने ऊस विकत घ्यावा लागत होता. 

 पशुखाद्याचा  १ जून २०१९ पासून ५० तर सरकी पेंड ५० किलोच्या पोत्यासाठी १ हजार रुपये दर होता़ त्यात वाढ झाली असून, आता १४०० ते १५०० रुपयांवर हा दर पोहोचला आहे़ त्यात आणखी भरच पडत आहे. वाढलेले सरकी पेंड व पशुखाद्याचे दर यामुळे दूध उत्पादकांचे कंबरडे चांगलेच मोडले आहे. 

 यानंतर पुन्हा एप्रिल २०२० मध्ये हीच परिस्थिती निर्माण झाली आहे़ दुधाचे दर वाढल्यानंतर पशुखाद्याचे दर वाढतात, मात्र दुधाचे दर कमी झाल्यानंतर पशुखाद्याचे दर कमी होत नाहीत़ याचा फटका दूध उत्पादकांना नेहमीच बसत आला आहे़ शेतकºयांकडून दूध कमी दराने खरेदी केले जात असले तरी बाजारात ग्राहकांना मात्र आहे त्याच दराने दूध घ्यावे लागत आहे.

 कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे २२ मार्चपासून संपूर्ण देशासह राज्यात लॉकडाउन पुकारला आहे़ या लॉकडाउनमध्ये अत्यावश्यक सेवांमधून दूध व्यवसाय सुरू असल्यामुळे राज्यातील सर्व डेअरी सुरू आहेत़ सध्या या डेअºयांमधून दूध पावडर व प्रक्रिया केलेली दूध पिशवी आदींचे उत्पादन सुरू आह़े  या डेअºयांना पोहोचलेल्या दुधाला तब्बल २५ दिवसांनंतर २३ रुपये इतका दर मिळाला आहे़ यात वाहतूक दूध संकलन केंद्राचे कमिशन, डॉक चार्ज वगळून शेतकºयांच्या हातामध्ये प्रति लिटर दर मिळत आहे.

दूध पावडर नफ्यातून फरक मिळावा
- दूध संकलन केंद्रावर जर्सी गाईच्या दुधासाठी फॅट ३.५ व डिग्री २९ लागल्यास चांगल्या प्रतीचे दूध मानले जाते़ या चांगल्या प्रतीच्या दुधाला सध्या २३ रुपये दर मिळतो आहे़ मात्र दूध संकलन केंद्राकडून फॅट व डिग्री दोन्ही कमी आल्या तर शेतकºयाला दोन रुपये प्रतिलिटर कमी मिळत असल्याची दबक्या आवाजात चर्चा दूध उत्पादकांमधून आहे. भविष्यात दूध पावडर विक्रीतून नफा झाला आहे़ या नफ्यातून दुधासाठी देण्यात आलेल्या रकमेचा फरक मिळावा, अशी मागणी दूध उत्पादक शेतकºयांमधून होत आहे़

सध्याची परिस्थिती पाहता दूध उत्पादकांसमोर नेहमीप्रमाणे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. शासनाने पशुखाद्याच्या किमतीवर नियंत्रण आणावे़ दूध संकलन केंद्र्रावर फॅट व डिग्री मोजणी आॅनलाइन करावी.
 - अण्णासाहेब ढाणे, माजी सरपंच, कुर्डू, ता. माढा

सध्या लॉकडाउनमुळे व आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडरचे दर घसरल्यामुळे दुधाचे दर अतिशय कमी झाले आहेत़ त्यामुळे संपूर्ण दुग्धव्यवसाय अडचणीत आला आहे. शासनाने मागील वर्षी मंजूर केलेले अनुदान त्वरित शेतकºयांच्या खात्यात जमा करावे़
 - संतोष शेंडे, दूध डेअरी चालक, कुर्डूवाडी

Web Title: Dairy in trouble; Milk prices fall, food prices rise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.