दक्षिण पंचायत समितीचे जिल्ह्यात पहिले संकेतस्थळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:22 AM2021-04-02T04:22:20+5:302021-04-02T04:22:20+5:30

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेल्या लॅन प्रणालीशी संकेतस्थळ जोडण्यात आले आहे. ग्रामीण भागातील जनतेला या संकेतस्थळाचा वापर व्हावा, अशी ...

Dakshin Panchayat Samiti's first website in the district | दक्षिण पंचायत समितीचे जिल्ह्यात पहिले संकेतस्थळ

दक्षिण पंचायत समितीचे जिल्ह्यात पहिले संकेतस्थळ

Next

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेल्या लॅन प्रणालीशी संकेतस्थळ जोडण्यात आले आहे. ग्रामीण भागातील जनतेला या संकेतस्थळाचा वापर व्हावा, अशी अपेक्षा सीईओ दिलीप स्वामी यांनी व्यक्त केली. जिल्ह्यातील पहिले संकेतस्थळ दक्षिण सोलापूर पंचायत समितीने सुरू केल्याबद्दल स्वामी यांनी कौतुक केले. याच वेळी पंचायत समितीच्या आवारात आयुर्वेदिक औषधींचे वृक्षारोपण लेखाधिकारी अजयसिंह पवार आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती चंचल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

अधिकारी व कर्मचाऱ्यांना तालुका संपर्क अधिकारी परमेश्‍वर राऊत यांच्या हस्ते आयएसओ प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

गटविकास अधिकारी राहुल देसाई यांनी प्रास्तविकात संकेतस्थळाची माहिती दिली. ग्रामीण जनतेला त्याचा पुरेपूर उपयोग होईल यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

याप्रसंगी आरोग्याधिकारी दिगंबर गायकवाड, रंजना कांबळे, मल्हारी बनसोडे, यशवंत गवळी, ए. ए. खैरदी, रणजित जाधवर, बी. व्ही. चव्हाण, सुधीर ढाकणे, जे. पी. मेटकरी, यू. आर. कोळी, विक्रम शहा, महेश नारायणकर, जे. पी. माने, त्रिमूर्ती राऊत यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. विवेक लिंगराज यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व आभार मानले.

---०१झेडपी संकेतस्थळ

दक्षिण सोलापूर पंचायत समितीने सुरू केलेल्या संकेतस्थळाचे उद्घाटन करताना सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी, शेजारी गटविकास अधिकारी राहुल देसाई, लेखाधिकारी अजयसिंह पवार, चंचल पाटील, परमेश्‍वर राऊत, आदी उपस्थित होते.

Web Title: Dakshin Panchayat Samiti's first website in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.