दलितमित्र सदाशिव खिलारे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:20 AM2021-05-01T04:20:52+5:302021-05-01T04:20:52+5:30

दलित वस्तीत अंगणवाडी सुरू करण्यापासून ते प्राथमिक, माध्यमिक शिक्षण मुलांना मिळावे यासाठी पाठपुरावा केला. परगावहून पंढरपुरात आलेल्या विद्यार्थ्यांना ...

Dalit friend Sadashiv Khilare passed away | दलितमित्र सदाशिव खिलारे यांचे निधन

दलितमित्र सदाशिव खिलारे यांचे निधन

Next

दलित वस्तीत अंगणवाडी सुरू करण्यापासून ते प्राथमिक, माध्यमिक शिक्षण मुलांना मिळावे यासाठी पाठपुरावा केला. परगावहून पंढरपुरात आलेल्या विद्यार्थ्यांना राहण्याची सोय व्हावी म्हणून स्व. भाऊसाहेब खुडे बोर्डिंगची संत शिवलिंग महाराज मठात व्यवस्था केली. त्या काळात दोन वेळा आमदार व खासदार होण्याची संधी नाकारत समाज सुधारणेचा वसा स्वीकारला. स्व.औदुंबर पाटील यांचे विश्वासू म्हत्न त्यांची ओळख होती. १९४५पासून त्यांनी स्वदेशी वस्तूचा वापर केला. ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध करण्यापासून ते गावातील वाद-विवाद आपापसात मिटवण्यापर्यंतचे कार्य त्यांनी पार पाडले. त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने १९९४-९५ काळात दलितमित्र पुरस्कार, तर शैक्षणिक कार्याची दखल घेऊन आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले, चार मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

---

३० सदाशिव खिलारे

Web Title: Dalit friend Sadashiv Khilare passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.