कांदा पावसात भिजल्याने नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:22 AM2021-04-15T04:22:02+5:302021-04-15T04:22:02+5:30

जिल्ह्यात गतवर्षी उशिरापर्यंत पाऊस पडत राहिल्याने सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात ऊस वगळता अन्य पिकांची हानी झाली होती. बऱ्याच ...

Damage caused by onion soaking in rain | कांदा पावसात भिजल्याने नुकसान

कांदा पावसात भिजल्याने नुकसान

Next

जिल्ह्यात गतवर्षी उशिरापर्यंत पाऊस पडत राहिल्याने सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात ऊस वगळता अन्य पिकांची हानी झाली होती. बऱ्याच ठिकाणच्या शेतीत पाणी डिसेंबर- जानेवारी महिन्यापर्यंत होते. तीन- चार वर्षांत पाणी अडविण्याची कामे मोठ्या प्रमाणावर झाल्याने अनेक ठिकाणी जमिनीला चिबड लागली होती. अशा जमिनीतील ओल हटल्यानंतर शेतकऱ्यांनी कांदा, टरबूज, खरबूज, कलिंगडे, पपईसह अन्य पिके केली आहेत; मात्र चार दिवसांच्या पावसाने या पिकांची हानी झाली आहे. उन्हाळी कांद्याची काढणी सुरू असून हा कांदा भिजल्याने नुकसान होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

---

यंदाही आंब्याचे नुकसान

सोलापूर जिल्ह्यात सुशिक्षित तरुण शेतकरी नवनवीन पिकांचे प्रयोग करीत आहेत. उत्तर सोलापूर, माळशिरस व इतर तालुक्यात केशर आंब्याची शेती आहे. यावर्षी काढणीला आलेल्या आंब्याचे वादळाने नुकसान झाले आहे शिवाय गुरुवारपासून लाॅकडाऊन लागणार असल्याने आंबा विक्रीसाठी गैरसोय होणार आहे.

Web Title: Damage caused by onion soaking in rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.