माढा तालुक्यात वादळी वाºयाने द्राक्षबागेचे नुकसान; द्राक्षमाल, बागेचे फाउंडेशन तुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 05:19 PM2019-03-07T17:19:54+5:302019-03-07T17:21:24+5:30

माढा: माढा तालुक्यातील केवड येथील सुनील संदिपानधर्मे यांच्या शेतात अचानक आलेल्या जोराच्या वावटळीमुळे ३० टन द्राक्ष मालाचे व बागेचे ...

Damage to grapes in Mandala taluka; Vineyard, the garden's foundation breaks | माढा तालुक्यात वादळी वाºयाने द्राक्षबागेचे नुकसान; द्राक्षमाल, बागेचे फाउंडेशन तुटले

माढा तालुक्यात वादळी वाºयाने द्राक्षबागेचे नुकसान; द्राक्षमाल, बागेचे फाउंडेशन तुटले

Next
ठळक मुद्देकेवड येथील सुनील संदिपान धर्मे यांनी आपल्या शेतात गेल्या तीन वर्षांपूर्वी बँक कर्ज  घेऊन द्राक्षबागेची लागवडवावटळीने अडीच एकर द्राक्षबाग जमीनदोस्त होऊन मोठे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती संबंधित शेतकºयाने दिलीकेवड या गावी जाऊन शासकीय अधिकाºयांनी घटनास्थळाची पाहणी केली व झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला

माढा: माढा तालुक्यातील केवड येथील सुनील संदिपानधर्मे यांच्या शेतात अचानक आलेल्या जोराच्या वावटळीमुळे ३० टन द्राक्ष मालाचे व बागेचे फाउंडेशन तुटून २७ लाखांचे नुकसान झाले.

केवड येथील सुनील संदिपान धर्मे यांनी आपल्या शेतात गेल्या तीन वर्षांपूर्वी बँक कर्ज  घेऊन द्राक्षबागेची लागवड केली होती. मंगळवारी झालेल्या वावटळीने अडीच एकर द्राक्षबाग जमीनदोस्त होऊन मोठे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती   संबंधित शेतकºयाने दिली. केवड या गावी जाऊन शासकीय अधिकाºयांनी घटनास्थळाची पाहणी केली व झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला.
कर्ज काढून मोठ्या अपेक्षेने द्राक्ष बागेचे संगोपन केले होते.

त्यामधून येणाºया उत्पन्नावर कर्ज फेडता येईल, या आशेने   आम्ही सर्व कुटुंबीय होतो, परंतु  या आलेल्या वावटळीमुळे बाग जमीनदोस्त होऊन नुकसान  झाले. त्यामुळे आम्ही आर्थिकदृष्ट्या खूपच अडचणीत येऊन आणखी कर्ज वाढणार असल्याची प्रतिक्रिया सुनील धर्मे यांनी दिली. बागेच्या फाउंडेशनचे सात लाख व द्राक्ष पिकाचे वीस लाख असे सत्तावीस लाखांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.

केवड येथील द्राक्ष बागेच्या झालेल्या नुकसानीबाबत पंचनामा करुन माढा कृषी कार्यालयाकडे फाईल सादर केली आहे.
- राजेश चव्हाण, तहसीलदार 

केवड येथील वावटळीने झालेल्या द्राक्ष बागेच्या नुकसानीचा पंचनामा केलेली फाईल आली आहे. या शेतकºयाच्या झालेल्या नुकसानीच्या फाईलचा पाठपुरवठा करीत आहोत.
- दत्ता येळे, माढा कृषी अधिकारी 

Web Title: Damage to grapes in Mandala taluka; Vineyard, the garden's foundation breaks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.