दामाजी कारखाना वाचविण्यासाठी निवडणुकीपूर्वीच जागे व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:27 AM2021-08-20T04:27:26+5:302021-08-20T04:27:26+5:30

मारवाडी वकिलांच्या काळात फक्त १९ कोटी ७० लाख कर्ज राहिले होते. स्व. भालके यांच्या काळात ५७ कोटींपर्यंत कर्ज होेते, ...

Damaji should wake up before the election to save the factory | दामाजी कारखाना वाचविण्यासाठी निवडणुकीपूर्वीच जागे व्हावे

दामाजी कारखाना वाचविण्यासाठी निवडणुकीपूर्वीच जागे व्हावे

Next

मारवाडी वकिलांच्या काळात फक्त १९ कोटी ७० लाख कर्ज राहिले होते. स्व. भालके यांच्या काळात ५७ कोटींपर्यंत कर्ज होेते, ते आता १५० कोटींच्यावर गेले आहे. अनेक बँका व पतसंस्थांची कर्जे थकीत ठेवली आहेत. शेतकरी सभासदांनी यावेळी गांभीर्याने विचार न केल्यास श्री संत दामाजी साखर कारखाना बंद पडेल अशी अवस्था निर्माण झालेली आहे. विद्यमान संचालक मंडळाने निवडणुकीपूर्वी १९ कलमी जाहिरनामा प्रसिद्ध करून सत्ता मिळविली. त्यातील १० रुपये किलोचे एकच वचन पाळले आहे. विद्यमान चेअरमन समाधान आवताडे यांनी कारखाना कर्जमुक्त करणार, अशी भीमगर्जना भर सभेत केली होती. सध्या कारखान्यावर दुपटीने कर्ज वाढल्याचे लेखापरीक्षण अहवालात दिसत आहे. ‘ब’ वर्गातील साखर कारखाना ‘क’ वर्गात नेऊन ठेवला आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी माजी संचालक यादाप्पा माळी, श्रीधर खांडेकर, माजी सभापती राजाराम जगताप, शिवसेना तालुकाध्यक्ष तुकाराम कुदळे, संजय कट्टे, ॲड. भारत पवार, डॉ. चंद्रशेखर तळ्ळे, विठ्ठल आसबे, भारत मासाळ, वसंत गरंडे, दामाजी शिंदे, शहाजी उन्हाळे, मोहन यादव, राजाराम इंगळे, किसन गवळी, शिवशंकर धायगोडे, सावता माळी, सुनील डोके, ॲड. राहुल घुले, बाळासाहेब खांडेकर, अमरसिंह खानविलकर, संदीप डोके आदी उपस्थित होते.

Web Title: Damaji should wake up before the election to save the factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.