‘दामाजी’ची निवडणूक फोडणार घाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:20 AM2021-02-07T04:20:32+5:302021-02-07T04:20:32+5:30
राज्यातील सहकारी संस्था अधिनियम १९६० कलम ७३ क मधील तरतुदीनुसार राज्य शासनाला कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमध्ये जनहिताच्या दृष्टीने सहकारी संस्थांच्या ...
राज्यातील सहकारी संस्था अधिनियम १९६० कलम ७३ क मधील तरतुदीनुसार राज्य शासनाला कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमध्ये जनहिताच्या दृष्टीने सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची तरतूद आहे. या तरतुदीनुसार कोरोनामुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीमुळे राज्यावर आलेल्या नैसर्गिक आपत्तीचा विचार करता १८ मार्च, १७ जून, २८ सप्टेंबर २०२० च्या आदेशान्वये सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ डिसेंबर २०२० पर्यंत पुढे ढकलल्या होत्या.
तालुक्यात ‘अ’ वर्गामध्ये मोजक्याच संस्था आहेत. सध्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीमध्ये दामाजी कारखान्याची निवडणूक तालुक्याच्या राजकारणामध्ये महत्त्वाची मानली जात आहे. संचालक होण्यासाठी तालुक्यामधून अनेक जण इच्छुक आहेत. त्यामुळे ही निवडणूक मतदारसंघाचा आमदार ठरवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. सध्या ‘ब’ वर्गात ५८, ‘क’ वर्गात २५, ‘ड’ वर्गात ५१ अशा १३४ सहकारी संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी तालुक्यामध्ये सुरू होणार आहे.
कोट ::::::::::::::::::
शासनाने मुदतवाढ दिल्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. निवडणुकीसंदर्भातील आदेशामुळे तालुक्यामधील ब, क, ड या वर्गातील एकूण १३४ संस्था आहेत. त्याबाबतची माहिती वरिष्ठ कार्यालयास दिली आहे.
- प्रमोद दुरगुडे
सहायक निबंधक, सहकारी संस्था