माढा विधानसभा मतदारसंघात आघाडीला धोक्याची घंटा
By Admin | Published: May 23, 2014 01:14 AM2014-05-23T01:14:45+5:302014-05-23T01:14:45+5:30
राष्टÑवादीला ७० तर महायुतीला ६३ गावात आघाडी
कुर्डूवाडी : लोकसभा निवडणुकीच्या निकालाद्वारे माढा विधानसभा मतदारसंघातून मतदारांनी राष्टÑवादी काँग्रेससमोर धोक्याची घंटाच वाजवली आहे. या विधानसभा मतदारसंघातील १३३ गावांपैकी ७० गावातून राष्टÑवादीला आघाडी दिली तर ६३ गावातून महायुतीला आघाडी मिळाली. यामुळे येणार्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधार्यांना बरीच कसरत करावी लागणार असल्याचे निकालावरुन दिसून येत आहे. माढा तालुक्यात विशेषत: विधानसभा मतदार संघात राष्टÑवादी काँग्रेसचे सर्वच संस्थांवर एकमुखी वर्चस्व आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत राष्टÑवादीसह काँग्रेस, शेकाप या प्रमुख पक्षांचे आमदार, माजी आमदार यांच्यासह अनेक पदाधिकार्यांनी उमेदवार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासाठी जीवाचे रान केले होते. त्या तुलनेत महायुतीचे सदाभाऊ खोत यांच्याकडे प्रचारासाठी यंत्रसामग्री कमी व कार्यकर्त्यांचाही वानवा दिसून आला. मात्र त्यांनी दिलेली चिवट लढत ही राष्टÑवादीसारख्या पक्षासाठी बरीच ओढाताण करावी लागली. मोहिते-पाटील यांच्यासाठी आमदार बबनराव शिंदे, माजी आमदार धनाजी साठे, भाई एस. एम. पाटील, सभापती रणजितसिंह शिंदे, जि. प. अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी, समाज कल्याणचे सभापती शिवाजी कांबळे, भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत, उपसभापती बंडू ढवळे आदी मातवरांनी तर खोत यांच्यासाठी प्रदेश सचिव संजय पाटील-घाटणेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, कुर्डूवाडीचे उपनगराध्यक्ष व रिपाइंचे बापूसाहेब जगताप, भाजपाचे तालुकाध्यक्ष विनायक भगत, विनायक उबाळे आदींनी प्रचाराची धुरा सांभाळली. महायुतीच्या नेत्यांनी आपल्या गावातून मताधिक्य दिले मात्र जि. प. अध्यक्षा माळीसह अनेकांना आपल्या गावातून राष्टÑवादीला मताधिक्य देता आले नाही. त्यामुळे राष्टÑवादीला आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. राष्टÑवादीकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले संजय शिंदे हे निवडणुकीपासून अलिप्त होते. सापटणे (टें), अरण, महाळुंग, वाघोली, उंबरे, जांबुड, बोरगाव आदी गावातून राष्ट्रवादीला मोठी आघाडी मिळाली तर मोडनिंब, लऊळ, उंदरगाव, घाटणे, भोसरे, मानेगाव, तुळशी, कुर्डू, पिंपळनेर, केवड आदी गावातून महायुतीला आघाडी मिळाली आहे. विधानसभा मतदार संघातून मोहिते-पाटील यांना अखेरच्या टप्प्यातील मतमोजणीत १४ हजार २२५ मतांची मिळालेली आघाडी ही त्यांच्या विजयासाठी महत्त्वाची ठरली. सदाभाऊ खोत यांची चिवट लढत ४माढा तालुक्यात विशेषत: विधानसभा मतदारसंघात राष्टÑवादी काँग्रेसचे सर्वच संस्थांवर एकमुखी वर्चस्व आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत राष्टÑवादीसह काँग्रेस, शेकाप या प्रमुख पक्षांचे आमदार, माजी आमदार यांच्यासह अनेक पदाधिकार्यांनी उमेदवार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासाठी जीवाचे रान केले होते. त्या तुलनेत महायुतीचे सदाभाऊ खोत यांच्याकडे प्रचारासाठी यंत्रसामग्री कमी व कार्यकर्त्यांचीही वानवा दिसून आली; मात्र त्यांनी चिवट लढत दिली.