माता रमाईंच्या पूर्णाकृती पुतळ्याचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:20 AM2021-02-08T04:20:26+5:302021-02-08T04:20:26+5:30
सोलापूर : आर. एस. मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मिलिंदनगर, बुधवार पेठ येथे अस्थी विहारसमोर त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांचा ...
सोलापूर : आर. एस. मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मिलिंदनगर, बुधवार पेठ येथे अस्थी विहारसमोर त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला. याचे सर्वांनी दर्शन घेतले. जिल्ह्यात प्रथमच माता रमाईंचा पूर्णाकृती पुतळा उभारला गेला आहे.
या पुतळ्याचे अनावरण पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर यांच्या हस्ते झाले. प्रारंभी सामुदायिक बुद्धवंदना घेतली. यावेळी संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘आम्ही रमाईच्या लेकी’ या उपक्रमांतर्गत सोलापूर शहरातील विविध महाविद्यालयांत बारावीत शिकणाऱ्या १४४ गरजू विद्यार्थिनींची बोर्डाची फी संस्थेच्या वतीने भरण्यात आली. यावेळी उपायुक्त कडूकर यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात काही विद्यार्थिनींना बोर्ड फी देण्यात आली. यावेळी डॉ. कडूकर यांनी माता रमाई यांच्या कार्याचा गौरव करून विद्यार्थिनींना शिक्षणाचे महत्त्व सांगितले. त्यानंतर उपस्थित विद्यार्थिनी व विविध क्षेत्रांतील महिलांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला.
यावेळी पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, संस्थेचे संस्थापक रवींद्र सरवदे, सुधाकर गुंडेली, मदन वडावराव, समीर नदाफ, रोहित जगताप, सागर बाबरे, राजू चिप्पा, राजू गज्जम, सोहन लोंढे, सचिन वाघमारे उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी किरण कांबळे, शिवम सोनकांबळे, अनिकेत तळभंडारे, संतोष कदम, माँटी बाबरे, नितीन कांबळे, विवेक इंगळे, आबा रणदिवे, दत्ता जगताप, सौरभ ईबतहल्ली, सोहन सोनकांबळे, आदित्य बाबरे, रोहित कांबळे, सागर साबळे, सोनू इंगळे, आप्पा तळभंडारे, सागर कांबळे, अथर्व बाबरे, अनुराग सूतकर, सागर बाबरे यांनी परिश्रम घेतले.
----
फोटो : ०७ माता रमाई
माता रमाई यांच्या सोलापूर शहरातील पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर आणि महिला उपस्थित होत्या.