बोलावून मिळालं दर्शन, सईबाईला पांडुरंग पावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:30 AM2020-12-30T04:30:06+5:302020-12-30T04:30:06+5:30
त्याचं असं झालं. राज्य परिवहन महामंडळाच्या बसवर असलेल्या पांडुरंगाचा फोटोला नतमस्तक होतानाचा सईबाई बंडगर यांचा फोटो कोणीतरी काढून तो ...
त्याचं असं झालं. राज्य परिवहन महामंडळाच्या बसवर असलेल्या पांडुरंगाचा फोटोला नतमस्तक होतानाचा सईबाई बंडगर यांचा फोटो कोणीतरी काढून तो सोशल मीडियावर शेअर केला. पाहता पाहता हा फोटो दूरपर्यंत व्हायरल झाला. दरम्यान, दर्शन सुरू झालंय म्हणून सईबाई मोहोळवरून पंढरीत आल्याची माहिती समजली. सोमवारी वारकरी पाईक संघाचे प्रवक्ते रामकृष्ण महाराज वीर यांनी पंढरीतल्या धार्मिक पुस्तकांच्या दुकानात सईबाई बंडगर यांना ओळखलं. त्या कै. अप्पासाहेब महाराज वासकर फडावरील नेमाचे वारकरी असल्याचं समजलं. वीर यांनी लागलीच मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांना त्या माउलीची माहिती दिली. त्यांनीही व्हायरल झालेले त्या माउलीचे फोटो पाहिले होते. त्यामुळे विठ्ठल जोशी व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सईबाईंना मंदिरात बोलावून घेऊन सन्मानपूर्वक श्री विठ्ठल आणि रुक्मिणीचे मुखदर्शन घडविले. सोबत विठ्ठल-रुक्मिणीची प्रतिमा, रुक्मिणी मातेची साडी भेट देऊन सत्कार केला.
-----
फोटो
काय म्हणाल्या सईबाई...
रामकृष्ण वीर महाराजांशी संवाद साधताना सईबाई म्हणाल्या, ‘‘एसटीवर देवाला बघून मला लय बरं वाटलं होतं... कवा हुईल वो दर्शन चालू... मला लई आस लागलीया बघा... कधी बीजंला दर्शन घेतलंय बघा... दोडाचा हा कसला रोग आलाय... आमची आन् देवाची ताटातूट झालीया. अन् बघा की, परवा एसटीवर देवाला बघून मला लय बरं वाटलं. म्या जाऊन तितंच डोकं टेकवलं बघा...’
-----