आजअखेर ११९३ कोंबड्या, १२५ अंडी केली नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:39 AM2021-02-18T04:39:39+5:302021-02-18T04:39:39+5:30
सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथमच मंगळवेढ्यातील जंगलगी येथे बर्ल्ड फ्लू हा संसर्गजन्य आजार आल्याने येथे जवळपास ७५३ कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या होत्या. ...
सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथमच मंगळवेढ्यातील जंगलगी येथे बर्ल्ड फ्लू हा संसर्गजन्य आजार आल्याने येथे जवळपास ७५३ कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या होत्या. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पशुपालकांमध्ये खळबळ उडाली होती. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी खबरदारीचा उपाय म्हणून येथील परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला होता. दरम्यान पोलीस प्रशासनाने या साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी या परिसरात कोंबड्यांची ने-आण करण्यावर बंदी घातली होती.
मृत्यूमुखी पडलेल्या कोंबड्यांचे नमुने पुणे प्रयोगशाळेकडे पाठविल्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पशुसंवर्धन अलर्ट झाले होते. जंगलगी पाठोपाठ गणेशवाडी येथे ४४०, भालेवाडी येथे ५४ कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. मात्र येथील मयत कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने इतर अज्ञात आजाराने त्या मयत झाल्या असाव्यात, असा अंदाज पशुसंवर्धन विभागाचा होता.
गुंजेगाव येथेही ३२ तर दामाजीनगर येथेही काही कोंबड्यांचा मृत्यू झाला होता.
कोट ::::::::::
सध्या तालुक्यामध्ये पक्ष्यांची मृत्यू संख्या कमी झाली असून ज्या ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत. त्या परिसरातील दहा किलोमीटर अंतरावरील पक्ष्यांचे नमुने घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्याचे काम सुरू आहे. हे काम तीन महिन्यापर्यंत करावे लागत आहे.
- डाॅ. गोविंद राठोड
तालुका पशुवैद्यकीय अधिकारी