माजी सैनिकाची कन्या बनली गोंदियाची जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:16 AM2021-07-16T04:16:20+5:302021-07-16T04:16:20+5:30
नयना खांडेकर-गुंंडे या मूळच्या गुंजेगाव येथील असून, त्यांचे वडील सैन्यात असल्याने नयना यांचे शिक्षण हिमाचल प्रदेश, पंजाब या महाराष्ट्राबाहेरील ...
नयना खांडेकर-गुंंडे या मूळच्या गुंजेगाव येथील असून, त्यांचे वडील सैन्यात असल्याने नयना यांचे शिक्षण हिमाचल प्रदेश, पंजाब या महाराष्ट्राबाहेरील राज्यांत झाले. महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी सोलापूरच्या संगमेश्वर महाविद्यालयात पूर्ण केले. त्या विद्यापीठात टॉपर विद्यार्थी म्हणून झळकल्या होत्या. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मुलींमध्ये उपजिल्हाधिकारीपदी सर्वप्रथम आल्या होत्या. त्यांनी सोलापूर पुनर्वसन, कुर्डूवाडी प्रांताधिकारी, नाशिक विभाग म्हाडाच्या मुख्याधिकारी म्हणून सेवा बजावलेली आहे. वर्धा येथे जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही पदभार सांभाळला होता.
१९९२ ला त्या उपजिल्हाधिकारी पदावर उस्मानाबाद येथे पहिली नेमणूक झाली होती. सध्या त्यांना बढती मिळाल्याने गोंदियाच्या जिल्हाधिकारीपदाची सूत्रे त्यांनी हाती घेतली आहेत. त्यांच्या वडिलांचे शिक्षण आयएएस झाल्याने त्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे त्या आज जिल्हाधिकारीपदापर्यंत पोहोचल्याचे त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. वडिलांचे आयएएस शिक्षण पूर्ण होऊनही त्यांनी सैन्यात आपली सेवा बजावली. जिल्हाधिकारी नयना खांडेकर-गुंडे यांच्या शिक्षणाची सुरुवात हैदराबाद येथील मिलिटरी स्कूलमधून झाली. त्यांचे पती डॉ. अर्जुन गुंडे हे सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत आहेत.
150721\img-20210715-wa0000.jpg
गोंदिया जिल्हाधिकारी नयना गुंडे-खांडेकर