सून जेवण देत नाही, मुलगा घर नावावर करण्यासाठी नेहमीच मारहाण करतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 07:42 PM2020-11-25T19:42:08+5:302020-11-25T19:42:32+5:30

ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी; महिला सुरक्षा कक्षाकडून आतापर्यंत २९ तक्रारीचे निवारण

The daughter-in-law does not give a meal, the boy always beats to name the house | सून जेवण देत नाही, मुलगा घर नावावर करण्यासाठी नेहमीच मारहाण करतो

सून जेवण देत नाही, मुलगा घर नावावर करण्यासाठी नेहमीच मारहाण करतो

googlenewsNext

सोलापूर - सुन जेवन देत नाही, मुलगा घर माझ्या नावावर कर म्हणून मारहाण करतो. मला न्याय द्या अशा विनंत्या करणार्या विविध प्रकारच्या ४० तक्रारी पोलीस आयुक्तालयातील महिला सुरक्षा कक्षाला प्राप्त झाल्या आहेत.

मुलगा वारंवार पैशाची मागणी करतो न दिल्यास मारहाण करतो. सुन माणसिक त्रास देते. मुलाला पैसे दिले नाहीत म्हणुन घरातुन हाकलून दिले आहे. आता मी या वयात जाऊ कोठे असा प्रश्न करीत ज्येष्ठ नागरिकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. या वर्षी लॉकडाऊनच्या दरम्यान मार्च, एप्रिल, मे आणि जून दरम्यान सर्वात जास्त २२ तक्रारी आल्या आहेत. १०४ वर्ष वय असलेल्या एका वृद्धाने राहत्या घरातून बेडवर असताना नातेवाईकाच्या मदतीने पोलीस आयुक्तालयात ॲानलाईन तक्रार दिली होती. विशेष कक्षाने याची दखल घेतली.

आम्ही वारंवार ज्येष्ठ नागरिकांच्या बैठका घेतो. त्यांच्या तक्रारी जाणुन घेतो, अन्यायकारक वाटत असेल तर त्यांच्या मुलांना बोलावुन समज देतो. तक्रारीचे निरसण करण्याचा प्रयत्न करतो, पोलीस स्टेशन कडे पाठवुन संबंधितांविरूद्ध गुन्हा दाखल करतो - - ज्योती कडू,

- सहायक पोलीस निरीक्षक

 

 

कुटुंबियांकडून दुर्लक्ष

  • - ज्येष्ठ नागरीक वारंवार अजारी पडतात, त्यामुळे मुलगा, सुन यांच्याकडुन दुर्लक्ष केले जाते. हा रोजचाच प्रकार आहे. किती दिवस आपण करत बसायचे या माणसिकते मधून दुर्लक्ष केले जाते.
  • - आपल्या मुलांचे त्याच्या सोबत सुनेचे बदललेला स्वभाव ज्येष्ठ नागरीकांसाठी अन्यायकार वाटतो. मग ते तक्रार करतात.
  • - घर जागा नावावर कर असे म्हणत मुलगा व सुन जाणिवपूर्वक माणसिक त्रास देतात. गोळ्या औषधाकडे दुर्लक्ष करतात.
  • - धोरणात्मक निर्णयामध्ये ज्येष्ठांचा विचार घेतला जात नाही. त्यांना तुमचे जुने विचार तुमच्या जवळ ठेवा असे सांगितले जाते.
  • - जेष्ठांच्या इच्छा, आवडी, निवडी याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. यामुळे अन्यायाची भावना ज्येष्ठांमध्ये निमार्ण होते.
  •  

समुपदेशाने मिटवले वाद; पितापुत्रामध्ये आणली गोडी

गेल्या आठ महिन्यात महिला कक्षाला प्राप्त झालेल्या तक्रारीपैकी २९ कुटुंबियांचे समुपदेशन करण्यात आले. दोन्ही कडचे म्हणने एकूण समेट घडवुन आणला. अटी शर्ती मान्य करीत पितापुत्र व सुनेतील वाद मिटवला. वाद करणार नाही असे लिहुन दिले.  

Web Title: The daughter-in-law does not give a meal, the boy always beats to name the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.