लाखों रुपयांच्या मुरुमाची दिवसाढवळ्या चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:16 AM2021-06-10T04:16:23+5:302021-06-10T04:16:23+5:30
बॅगेहळ्ळी रस्त्यावर अक्कलकोट शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात माळरान आहे. तेथून गेल्या दोन महिन्यांपासून रोज विशिष्ट ...
बॅगेहळ्ळी रस्त्यावर अक्कलकोट शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात माळरान आहे. तेथून गेल्या दोन महिन्यांपासून रोज विशिष्ट वेळेत जेसीबीद्वारे मुरुमाचा उपसा करून हायवाद्वारे वाहतूक केली जात आहे. कधी शासकीय माळरानावरून तर कधी खासगी जमिनीतून विनापरवाना मुरुमाची चोरी केली जात आहे. लॉकडाऊन कालावधीत दिवसाढवळ्या दोन महिन्यांपासून चोरी होत असताना संबंधित विभागाकडून कोणीही दखल कशी घेतली नाही याबद्दल नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.
विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी कोरोना ड्युटीमध्ये अडकलेले पाहून या संधीचा मुरुमचोर गैरफायदा घेत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. दररोज पहाटे ६ ते सकाळी ९, तर दुपारी ४ ते सायंकाळी ७ यावेळेत मुरुमाची चोरी होत आहे. हा प्रकार आजही नित्याने सुरू आहे.
----
तत्काळ चौकशी करू
तीन महिन्यांपासून सर्वच यंत्रणा कोरोना ड्युटीवर होती. याचा गैरफायदा घेऊन काही लोक गौण खनिजाची चोरी करीत असतील तर याबाबत तत्काळ चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे मंडलाधिकारी चंद्रकांत इंगोले यांनी स्पष्ट केले.
-----
०९अक्कलकोट-मुरुम
बॅगेहळ्ळी रस्त्याच्य कडेच्या गायरान जमिनीतून रोज मुरुमाची चोरी होत आहे. त्याचे मोठमोठे खड्डे पडलेले दिसत आहेत.