पिंपळनेरमध्ये डीसीसी बँक फोडून संगणक साहित्य पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:16 AM2020-12-07T04:16:10+5:302020-12-07T04:16:10+5:30
कुर्डूवाडी : माढा तालुक्यातील पिंपळनेर येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेचे कुलूप तोडून चोरट्याने ४२ हजार रुपयांचे संगणकीय साहित्य ...
कुर्डूवाडी : माढा तालुक्यातील पिंपळनेर येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेचे कुलूप तोडून चोरट्याने ४२ हजार रुपयांचे संगणकीय साहित्य पळविले. याबाबत शाखाधिकारी नवनाथ जनार्दन दगडे यांनी कुर्डूवाडी पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार पिंपळनेर येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतील कर्मचारी शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता आपले कामकाज उरकून घरी गेले होते. रविवारी सकाळी निमगाव (टें) येथील शाखेच्या शिपायाने दगडे यांना फोनवरुन बँकेच्या ग्रीलचा व लाकडी दरवाजा उघडा असून ग्रीलचे कुलूप कापलेले दिसत असल्याची माहिती दिली. दगडे यांनी तिथे येऊन पाहिले असता बँकेतील संगणक साहित्य चोरीला गेल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी चार माॅनिटर, चार सीपीयू, प्रिंटर, युपीएस इन्व्हर्टर, दोन बॅटऱ्या असा एकूण ४२ हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे. याबाबत कुर्डूवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.