डीसीसी बँक.. ६७९ कर्मचारी कमी झाल्याने १०१७ कर्मचाऱ्यांवर भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:27 AM2021-06-09T04:27:50+5:302021-06-09T04:27:50+5:30

उत्तर सोलापूर : वयोमानानुसार सेवानिवृत्त, निधन व स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने ६७९ कर्मचारी कमी झाल्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कामकाज १०१७ ...

DCC Bank .. Loss on 1017 employees due to reduction of 679 employees | डीसीसी बँक.. ६७९ कर्मचारी कमी झाल्याने १०१७ कर्मचाऱ्यांवर भार

डीसीसी बँक.. ६७९ कर्मचारी कमी झाल्याने १०१७ कर्मचाऱ्यांवर भार

Next

उत्तर सोलापूर : वयोमानानुसार सेवानिवृत्त, निधन व स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने ६७९ कर्मचारी कमी झाल्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कामकाज १०१७ कर्मचाऱ्यांवर सुरू आहे. कर्मचारी कमी झाले असले तरी संगणकीय जोड मिळाल्याने कामकाज सुलभ झाले असल्याचे सांगण्यात आले.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांचा विस्तार जसा होत गेला, तशी कर्मचारी संख्या वाढत गेली. १९९८ मध्ये नव्याने कर्मचारी भरती केल्याने संख्या १६९६ इतकी झाली होती. वि. गु. शिवदारे, बाबूराव चाकोते, ब्रह्मदेव माने, सुधाकरपंत परिचारक, एस.एम.पाटील तसेच विजयसिंह मोहिते-पाटील, गणपतराव देशमुख यांचा काटकसरीचा कारभार व बँकेच्या हितासाठी एकमुखी निर्णय होत असल्याने बँकेची भरभराट होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांची गरजही होती.

मात्र अलीकडे १५ वर्षांत प्रगतीपेक्षा अधोगतीच सुरू असल्याने नवीन कर्मचारी भरती झाली नाही. भरतीसाठी परवानगीही मिळाली नाही.

मागील २४ वर्षांत वरचेवर ६७९ कर्मचारी सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्ती व राजीनामा दिल्याने कमी झाले आहेत. दरवर्षी कर्मचारी कमी होत असले तरी संगणकीय कामकाजामुळे आहे त्या कर्मचाऱ्यांवरच कामकाज केले जाते. संगणकीय प्रणालीत वरचेवर सुधारणा होत असल्याने कामकाजात अधिक सुटसुटीतपणा येत आहे. त्यामुळेही कमी कर्मचाऱ्यांवर कामकाज पार पाडले जाते.

---

सचिवही आले ५० टक्क्यांवर

सोलापूर जिल्ह्यात १२६४ विकास सोसायट्या असून, यासाठी एक हजार सचिव कार्यरत होते. सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्ती व मृत्यूंमुळे वरचेवर संख्या कमी होत ती ४८६ वर आली आहे. ६२ सोसायट्यांनी स्वतःच सचिव नेमले आहेत.----

फोटो- जिल्हा बँक...

Web Title: DCC Bank .. Loss on 1017 employees due to reduction of 679 employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.