७५ वर्षीय वृध्द महिलेचा पानमंगरुळच्या शेतात विचित्र पद्धतीने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 10:39 AM2019-01-22T10:39:55+5:302019-01-22T10:41:52+5:30

अक्कलकोट : करजगी येथील बँकेत जमा झालेले वृद्धापकाळ योजनेचे मानधन घेण्यासाठी पानमंगरूळची वृद्धा पतीसह निघाली. पतीने बसने जाण्याचा आग्रह ...

Death of a 75-year-old old woman in a strange way in the palm farm | ७५ वर्षीय वृध्द महिलेचा पानमंगरुळच्या शेतात विचित्र पद्धतीने मृत्यू

७५ वर्षीय वृध्द महिलेचा पानमंगरुळच्या शेतात विचित्र पद्धतीने मृत्यू

Next
ठळक मुद्देतीन दिवसांनंतर घटना उघडकीस, तपास पथक कर्नाटकात रवानायाबाबत दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला च्शवविच्छेदनात मयताच्या गुप्त भागामध्ये २0 ते २५ इंच मक्याचे चिपाड आढळलेघटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रीतम यावलकर, सपोनि देवेंद्र राठोड यांनी भेट दिली

अक्कलकोट : करजगी येथील बँकेत जमा झालेले वृद्धापकाळ योजनेचे मानधन घेण्यासाठी पानमंगरूळची वृद्धा पतीसह निघाली. पतीने बसने जाण्याचा आग्रह धरला, तरीही तिने न जुमानता पायी जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, एका दुचाकीस्वाराने तिला गाडीवर बसवून नेले खरे, पण ती परत घरी आलीच नाही. तिसºया दिवशी तिचा मृतदेह कडबगाव येथील शिवारात अत्यंत विचित्र अवस्थेत स्थितीत आढळून आला. तपासासाठी पथक इंडीला रवाना झाले आहे.

हा प्रकार शनिवार ते सोमवारदरम्यान घडला. याबाबत दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक माहिती अशी की, या घटनेतील मयत महिला ७५ वर्षीय आहे. शनिवारी पीडित महिला व तिचा पती दस्तगीर फुलारी हे दोघे मंगरूळ येथून करजगी येथील बँकेत जमा झालेले निराधार योजनेचे मानधन घेऊन येण्यासाठी बसस्थानकापर्यंत आले.

पती बसने जाऊन येऊ असे म्हणत असतानाही ती महिला न ऐकता ‘मी चालत जाते’म्हणून पायी निघाली. दरम्यान, कोणी तरी अज्ञात इसमाने त्या महिलेला मोटरसायकलवर घेऊन करजगीकडे गेल्याचे काही लोकांनी पाहिले. तेथून पुढे काय घडले हे कोणालाही माहिती नाही.

थेट दुसºया दिवशी म्हणजेच रविवारी दुपारी तीनच्या दरम्यान कडबगाव (ता. अक्कलकोट) येथील महांतेश तुकाराम राठोड यांच्या जमीन गट क्र. १६७ मध्ये असलेल्या बांधावरील लिंबाच्या झाडाखाली ती महिला मृतावस्थेत आढळून आली. याबाबत पोलीस पाटील महानंदा चंद्रकांत माळी यांनी खबर दिली.

त्यानंतर तत्काळ घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रीतम यावलकर, सपोनि देवेंद्र राठोड यांनी भेट दिली. मृतदेह बेवारस म्हणून घोषित करण्याच्या विचारात पोलीस होते. दरम्यान मयताच्या नातेवाईकांना ही बातमी कळताच त्यांनी पोलीस ठाणे गाठून ओळख पटवली.

सोमवारी सकाळी ग्रामीण रुग्णालयात डॉ. राठोड यांनी शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले. सोमवारी दुपारी पानमंगरूळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, तीन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. अधिक तपास हवालदार राजा नाईकवाडी करीत आहेत.

अंगावर जखमा, हात तुटलेला आढळला
च्शवविच्छेदनात मयताच्या गुप्त भागामध्ये २0 ते २५ इंच मक्याचे चिपाड आढळले आहे. या चिपाडामुळेच तिच्या शरीरातून रक्तस्त्राव झाला असावा. तिच्या शरीरावर विविध ठिकाणी जखमाही होत्या. डावा हात तुटलेला आढळून आला. अशा विचित्र पद्धतीने त्या वृद्धेचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनात समोर आले आहे. हा खून आहे की काय, याचा शोध घेण्यासाठी हवालदार राजा नाईकवाडी, मल्लिनाथ कलशेट्टी, वीरभद्र उपासे यांचे पथक तपासासाठी कर्नाटकातील इंडी येथे रवाना झाले आहे. 

Web Title: Death of a 75-year-old old woman in a strange way in the palm farm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.