चुकीच्या उपचारांमुळे रुग्णाचा मृत्यू ; पंढरपूरातील घटना, मृतदेह ठेवला रूग्णालयातच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 12:08 PM2018-09-15T12:08:01+5:302018-09-15T12:10:20+5:30
मुस्लिम समाजातील विविध समाजसेवकांनी संबंधित डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करावी. रुग्णालय कायमस्वरूपी बंद करावे अशी मागणी पोलिसांकडे केली.
पंढरपूर : येथील लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये चुकीचा उपचार दिल्याने रुग्णाचा मयत झाल्याचा आरोप करत रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी करून गोंधळ केला आहे. मयत झालेल्या व्यक्तीचे नाव हसन बुरान शेख ( वय ४०, रा. कोर्टी, ता. पंढरपूर) असे आहे.
पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथे राहणारे हसन शेख यांच्या डोक्याला जबर मार लागला होता यामुळे त्यांना पंढरपुरातील लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आले. या रुग्णाचा रुग्णालयात योग्य उपचार केला जाईल असे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी दाखल केले.
मात्र या ठिकाणी हसन शेख यांच्या योग्य तपासण्या झाल्या नाहीत तसेच त्यांना योग्य उपचार मिळाले नाही. त्याचबरोबर दुस?्या रुग्णाचे उपचार हसन शेख यांना देण्यात आले. यामुळे त्यांचा मृत्यू झाला. असा आरोप करत रुग्णाच्या नातेवाइकांनी व कोटार्तील ग्रामस्थांनी रुग्णालयांमध्ये गर्दी केली. गर्दी पाहून डॉक्टर देशमुख व अन्य डॉक्ट रांनी त्या ठिकाणावरून पलायन केले.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तत्काळ उपपोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे व पो नि. श्रीकांत पाडूळे हे त्यांच्या पथकासह रुग्णालयात पोहोचले. यावेळी मुस्लिम समाजातील विविध समाजसेवकांनी संबंधित डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करावी. रुग्णालय कायमस्वरूपी बंद करावे अशी मागणी पोलिसांकडे केली.
मृतदेह ठेवला रुग्णालयात
चुकीचा उपचार देणाऱ्या डॉक्टर वर गुन्हा दाखल करा व रुग्णालय बंद करा या मागणीसाठी रुग्णाच्या नातेवाईकांनी मयत झालेले हसन शेख यांचा मृतदेह रुग्णालयात आणून ठेवला आहे.