आरोग्य कर्मचा-याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:24 AM2021-09-18T04:24:27+5:302021-09-18T04:24:27+5:30

माढा : दारफळ सीना येथील आरोग्य सेवक कुतूब शहनवाज सय्यद (वय ४५) या हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना ...

Death of a health worker | आरोग्य कर्मचा-याचा मृत्यू

आरोग्य कर्मचा-याचा मृत्यू

Next

माढा : दारफळ सीना येथील आरोग्य सेवक कुतूब शहनवाज सय्यद (वय ४५) या हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना छत्रपती शिवाजी महाराज चौकातील बसस्थानक परिसरातील उपळाई रोड लगत घडली.

शुक्रवारी ही घटना घडली. मृत कुतुब नेहमीप्रमाणे शुक्रवारी १७ रोजी सकाळी कामावर जाण्यासाठी निघाले होते. माढ्यातील गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसस्थानक परिसरात सोलापूर रोड लगत स्वतःची चारचाकी कार लावून थांबले होते. माढा परिसरात त्यांचा वावर असल्याने त्यांचा परिचय होता. रस्त्याच्या कडेला लावलेल्या गाडीकडे कोणी लक्ष दिले नाही. सायंकाळच्या सुमारास ते गाडीतच पडल्याची माहिती समजताच उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिका-यांनी उपचारापूर्वीच मृत पावल्याचे सांगितले. याबाबत निजाम बादशहास सय्यद यांनी स्वतःच्या कारमध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने मयत झाल्या बाबतची माढा पोलिसात खबर दिली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, बहीण दोन मुले परिवार आहे.

-----

१७ कुतूब सय्यद

170921\2047-img-20210917-wa0036.jpg

मयत कुतुब सय्यद

Web Title: Death of a health worker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.